इमानदारी ! याला म्हणतात खरे प्रेम ….घर सोडून परदेशात गेलेल्या मालकाची 3 वर्ष वाट पाहतोय श्वान

पोलिसनामा ऑनलाईन – पाळीव प्राण्यांमध्ये प्रेम सर्वाधिक असल्याचे बोलले जाते. माणसापेक्षा प्राणीच जास्त जीव लावतात, हे खरं आहे. याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून आला आहे. चीनमधल्या एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हा श्वान गेल्या 3 वर्षांपासून मालकाची घरी परत येण्याची वाट पाहत आहे. या श्वानाचे नाव हीझी आहे.

श्वान ज्या कुटुंबासोबत राहत होता तो आता दक्षिण कोरियामध्ये स्थायिक झाले आहेत. या कुटुंबाने आपल्या श्वानालासोबत नेले नाही. त्यामुळे त्या दिवसापासून तो आपल्या मालकाच्या परत येण्याची वाट पाहत आहे. या श्वानाची निष्ठा पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. चीनच्या झियान शहरात राहणारे एक कुटुंब सन 2017मध्ये दक्षिण कोरियामध्ये गेले परंतु त्यांनी या श्वानाला इथेच सोडले होते. मात्रा मालक जाऊन वर्षे झाल्यानंतरही हा श्वान घराबाहेर त्यांच्या येण्याची वाट पाहत आहे. पूर्वी, स्थानिक अधिकार्‍यांनी या श्वानाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण प्रकरण समोर आले.