LPG Commercial Gas Cylinder Price | सणासुदीत सर्वसामान्यांना झटका ! गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सणासुदीचे दिवस सुरु असतानाच आता सामान्यांना मोठा झटका बसला आहे. आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्यांना गॅस सिलिंडरच्या दरवाढीने (LPG Commercial Gas Cylinder Price) आणखी मोठा दणका बसला आहे. आजपासून (रविवार 1 ऑक्टोबर) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 209 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल वितरण कंपनीच्या (Oil Distribution Company) गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ (LPG Commercial Gas Cylinder Price) करण्यात आली आहे.

तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आज पासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 209 रुपयांनी महाग मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किंमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

दरम्यान, 209 रुपयांच्या दरवाढीनंतर (LPG Commercial Gas Cylinder Price) नवी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1731.50 रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 157 रुपयांची कपात करण्यात आली होती.
आता एका महिन्यातच गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 209 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्यानंतर 19 किलोच्या
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची 1522 रुपयांना विक्री केली जात होती.
यात आज पासून 209 रुपयांची वाढ केल्याने 1731 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोलकात्यात या सिलेंडरची किंमत 1636, चेन्नईत 1898 तर मुंबईत 19 किलोच्या
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1482 वरुन 1684 रुपये इतकी करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनवर भर दिवसा प्रवाशाला लुटले; दोघा सराईत गुंडांना अटक