LPG Connection | कुटुंबात कुणाकडे असेल LPG कनेक्शन, तर तुम्हाला सुद्धा मिळेल नवीन कनेक्शन; जाणून घ्या ‘या’ सुविधेबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LPG चे नवीन कनेक्शन (LPG Connection) घेणे सुद्धा आता ऑनलाइन शॉपिंग करण्याइतके सोपे झाले आहे. अगोदर गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुमच्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ असणे आवश्यक होते, तेव्हाच LPG Connection मिळू शकत होते. अनेकदा इतर कारणामुळे सुद्धा गॅस कनेक्शन मिळण्यात अडचण येत होती, परंतु आता नवीन नियमांमुळे ही अडचण सुद्धा दूर झाली आहे.

विना अ‍ॅड्रेस प्रूफ मिळेल गॅस कनेक्शन

जर कुटुंबात कुणाकडेही एलपीजी कनेक्शन असेल तर तुम्हाला सुद्धा कनेक्शन सहज मिळेल. यासाठी अ‍ॅड्रेस प्रूफ देण्याची आवश्यकता नाही. याचा फायदा पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत घेता येईल.

कोणत्याही नातेवाईकाच्या नावावर अगोदरपासून एखादे गॅस कनेक्शन घेतलेले असेल तर कुटुंबातील इतर सुद्धा या पत्त्याचा फायदा घेऊ शकतात.
केवळ हा पत्ता व्हेरिफाय करावा लागेल.
कुटुंबात ज्या तेल मार्केटिंग कंपनीचा गॅस सिलेंडर येतो,
त्या गॅस एजन्सीत जावे लागेल आणि मुळ गॅस कनेक्शनशी संबंधीत कागदपत्र द्यावी लागतील.
व्हेरिफिकेशननंतर नवीन गॅस कनेक्शन मिळेल.

उज्जवला योजनेंतर्गत सुद्धा मिळणार

उज्ज्वला योजनेंतर्गत सुद्धा असे गॅस कनेक्शन बुक केले जाऊ शकते.
तुम्हाला केवळ तुमचे आधार कार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधीत कागदपत्रांची कॉपी गॅस एजन्सीत जाऊन द्यावी लागेल आणि नवीन गॅस कनेक्शनसाठी अ‍ॅप्लाय करावे लागेल.
एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेता येऊ शकतात.

कारण सर्व गॅस कनेक्शन आधारशी लिंक्ड असतात, यासाठी कोणत्याही घोटाळ्याची शक्यता नाही.
एलपीजी गॅस कनेक्शन ऑनलाइन अर्ज किंवा तो ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी झाली आहे.

Web Title : LPG Connection | if someone in the family has lpg connection then you will get a new connection know about this facility

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Porn on Internet | 3000 रूपये भरा अन्यथा होईल अटक, पॉर्न पाहिल्याप्रकरणी बनावट नोटिसा पाठवून 1000 जणांना गंडवलं, केली 40 लाखाची कमाई

Allergic To Eggs | अंडी सेवन केल्यानंतर पचत नाहीत? अ‍ॅलर्जी असल्यास काय करावं? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

Sharp Mind | ‘सुपर अ‍ॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या