नवी दिल्ली : LPG connection | आता तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅसचे नवीन कनेक्शन (LPG connection) घेण्यासाठी डिस्ट्रीब्यूटरच्या ऑफिसच्या फेर्या माराव्या लागणार नाहीत. आता तुम्हाला एलपीजी कनेक्शन घ्यायचे असेल तर केवळ एक कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळू शकतो.
मात्र, ही सुविधा सध्या केवळ इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) कडूनच एलपीजी कनेक्शन घेतल्यास मिळेल. यासाठी तुम्हाला 8454955555 नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. जर तुम्हाला गॅस सिलेंडर भरायचा असेल तरी सुद्धा हाच नंबर उपयोगी येईल. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरून केवळ 8454955555 वर एक मिस कॉल द्यायचा आहे.
आयओसीच्या चेअरमनने सोमवारी मिसकॉल देऊन सिलेंडर भरणे आणि नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची सुविधा सुरू केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशाच्या कोणत्याही कोपर्यात राहणारे ग्राहक या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच आयओसीने दरवाजावर एक सिलेंडरचा प्लान दोन सिलेंडरमध्ये बदलण्याची सुद्धा सुविधा सुरू केली आहे.
या प्लानमध्ये जर ग्राहकाला 14.2 किग्रॅचा दुसरा सिलेंडर घ्यायचा नसेल तर तो केवळ 5 किग्रॅचा
घेऊ शकतो. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने मिस्ड कॉलवर नवीन कनेक्शन देणे किंवा सिलेंडर
भरण्याची सुविधा निवडक शहरात सुरू केली होती. आता 9 ऑगस्टपासून ही सेवा संपूर्ण देशात सुरू झाली आहे.
असा बुक करू शकता एलपीजी सिलेंडर
– आपल्या रजिस्टर्ड नंबरवरून 8454955555 वर मिस कॉल द्या.
– भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या द्वारे सुद्धा एलपीजी सिलेंडर रिफिल करू शकता.
– इंडियन ऑईलचे अॅप किंवा https://cx.indianoil.in च्या द्वारे सुद्धा बुकिंग होते.
– कस्टमर्स 7588888824 वर व्हॉट्सअप मेसेजद्वारे सिलेंडर भरू शकतात.
– याशिवाय 7718955555 वर एसएमएस किंवा आयव्हीआरएस करून सुद्धा बुकिंग करू शकता.
– अमेझॉन आणि पेटीएमद्वारे सुद्धा सिलेंडर भरू शकता.
Pune Crime | शिरुरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेल चालक, मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका
Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा