LPG Connection | खुशखबर ! मोदी सरकार देणार मोफत गॅस कनेक्शन, कोणत्याही पत्त्यावर घेऊ शकता; लागू करताहेत ‘हा’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Connection | मोदी सरकार (Modi Government) लवकरच उज्ज्वला योजनेचा (Ujjwala Yojana) दूसरा टप्पा लागू करणार आहे. सरकारी तेल कंपन्या आता उज्ज्वलाच्या दुसर्‍या टप्प्याचा अंतिम आराखडा तयार करत आहेत. तुम्ही या योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत ते लोकसुद्धा LPG Connection घेऊ शकतील ज्यांच्याकडे स्थानिक पत्त्याचा पुरावा नाही.

या योजनेचा लाभ शहरात राहणार्‍या गरीबांना मिळेल. सोबत नोकरीनिमित्त देशभरात वेगवेळ्या ठिकाणी वास्तव्य करणार्‍यांना सुद्धा याचा लाभ मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM nirmala sitharaman) यांनी या योजनेत 1 कोटी कनेक्शन देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. 1 मे 2016 ला पीएम मोदींनी या योजनेची सुरूवात केली होती. 18 वर्षावरील महिलांना या योजनेत मोफत गॅस कनेक्शन मिळते. त्यांच्याकडे बँक खाते आणि बीपीएल कार्ड (BPL Card) आवश्यक आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज…

सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाइटवर जा.

pmujjwalayojana.com वर क्लिक करा.

होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जाऊन क्लिक करा.

डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.

आता फॉर्ममध्ये नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.

आता ओटीपी जनरेट करण्यासाठी बटनावर क्लिक करा.

यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.

फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीत जमा करा
आता हा फॉर्म जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करा. यासोबत डॉक्युमेंट आधार कार्ड, स्थानीय पत्त्याचा पुरावा, दारिद्रय रेषेखालील रेशन कार्ड (BPL Ration Card) आणि फोटो द्यावा लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.

Web Title :- lpg connection ujjwala yojana modi government will gives free gas connection check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Corona Vaccine | व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोविड संसर्गाचा धोका तिप्पटीने कमी, स्टडीत दावा

Corona Vaccine | Johnson & Johnson च्या सिंगल डोस लशीला भारतात मंजुरी, केंद्रीय आरोग्यमंत्र्याची माहिती

LPG Gas Leak at Kasturba Hospital | कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती, 58 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले