बुरे दिन ! सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर महागला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑक्टोबर महिन्याची सुरुवात महागाईने झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती वापराच्या गॅसच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये गॅसच्या दरांमध्ये वाढ झाली असून विना सबसिडी गॅसच्या दरात 15 रुपये वाढ करण्यात आली आहे.

द्यावे लागणार इतके पैसे –
आजपासून दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाच्या विना सबसिडीच्या गॅससाठी 605 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात यासाठी 630 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे 574.50 आणि 620 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 19 किलोग्रॅमच्या गॅससाठी दिल्लीमध्ये 1085 तर कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबईत 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1199 रुपये मोजावे लागणार आहेत.

सप्टेंबरमध्ये वाढले होते दर –
सप्टेंबर महिन्यात 14.2 किलोवजनाच्या गॅससाठी 590 रुपये मोजावे लागत असत. तर कोलकातामध्ये हाच दर 616.50 रुपये होता. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे 562 आणि 606.50 रुपये दर होता.

ऑगस्टमध्ये कमी झाला दर –
ऑगस्ट महिन्यात गॅसच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली होती. त्यावेळी 62.50 रुपये कपात करण्यात आली होती. त्यावेळी 14.2 किलोवजनाच्या गॅससाठी दिल्लीमध्ये 590 रुपये मोजावे लागत असत तर कोलकातामध्ये 601 रुपये मोजावे लागत होते.

Visit : policenama.com