मिस कॉलनेच होईल LPG सिलिंडर बुकिंगचे काम, आता सेव्ह करा ‘हा’ नंबर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन गॅस ग्राहकांसाठी आता एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग करणे सोपे झाले आहे. इंडियन ऑईल एलपीजी ग्राहक आता केवळ मिस कॉलद्वारे देशातील कोणत्याही भागात सिलिंडर बुक करू शकतात. मिस्ड कॉलसाठी इंडियनने 8454955555 क्रमांक जारी केलेला आहे. शुक्रवारी याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आले. मिस्ड कॉलद्वारे गॅस सिलिंडर बुक सहज उपलब्ध होईल. पूर्वीप्रमाणे आता ग्राहकांना जास्त वेळ कॉल होल्डवर धरावा लागणार नाही. तसेच मिस कॉलद्वारे बुकिंग करण्याचा एक फायदा म्हणजे आयव्हीआरएस कॉलप्रमाणेच ग्राहकांना कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही.

या सुविधेमुळे ज्यांना आयव्हीआरएस कॉलमध्ये अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी एलपीजी गॅस बुक करणे सोपे होईल. तसेच वयोवृद्ध लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी भुवनेश्वर येथून मिस कॉल सुविधा सुरू केली.

या 7 शहरांमध्येही उपलब्ध होणार जागतिक दर्जाचे पेट्रोल
इंडियन ऑईलने एक्सपी 100 म्हणून ब्रँड केलेल्या वर्ल्ड क्लास प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टन 100) च्या दुसर्‍या टप्प्याचे अनावरणही केले आहे. हे पेट्रेल हाय-एंड कारसाठी असेल. दुसर्‍या टप्प्यात, एक्सपी 100 चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, कोची, इंदूर आणि भुवनेश्वर अशा इतर 7 शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे. सर्वप्रथम हे राजधानी दिल्लीसाठी सुरू करण्यात आले आहे.

6 वर्षात 17 कोटी लोकांपर्यंत पोहोचले एलपीजी कनेक्शन
एलपीजी कनेक्शनसाठी मिस कॉल सेवाही आज भुवनेश्वरमध्ये सुरू करण्यात आली आहे. लवकरच देशातील इतर शहरांमध्ये ते बाजारात आणले जाईल. या चर्चेदरम्यान धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, गॅस वितरणाची मुदत एका दिवसापासून काही तासांपर्यंत कमी केली जावी यासाठी त्यांनी गॅस एजन्सी आणि वितरकांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, एलपीजीसंदर्भात देशाने बरेच अंतर कमी केेल आहे. 2014 पूर्वी, जवळजवळ 2 दशकांत 2 कोटी लोकांजवळ एलपीजी कनेक्शन होते. आता गेल्या 6 वर्षात ती संख्या 30 कोटींवर गेली आहे.

देशातील सर्वात जुन्या म्हणजे आसाम डिग्बोई येथून येणाऱ्या XP100 च्या पहिल्या लोडला हिरवा झेंडा दाखवत प्रधान म्हणाले की, हे इंधन जागतिक दर्जाचे आहे आणि उच्च-स्पीड कारची कामगिरी वाढवेल. मथुरा आणि बरौनीसमवेत, डिग्बोई देखील रिफायनरीजमध्ये सामील झाले आहेत जिथे एक्सपी 100 पेट्रोल तयार होते. यासाठी केवळ विद्यमान पायाभूत सुविधा वापरली जातात.