Homeताज्या बातम्याLPG Cylinder Booking | गॅस सिलेंडर बुक करण्यास विसरलात तर नो-टेन्शन; कंपनी...

LPG Cylinder Booking | गॅस सिलेंडर बुक करण्यास विसरलात तर नो-टेन्शन; कंपनी पाठवेल ‘अलर्ट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : LPG Cylinder Booking | अनेकदा असा अनुभव येतो की, जेव्हा घरात खुप आवश्यक काम असते तेव्हाच स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर रिकामा होतो. आणि अशावेळी घरात वेगळा भरलेला सिलेंडर (LPG Cylinder Booking) नसेल तर किती अडचण होऊ शकते याचा अंदाज लावू शकता.

 

सामान्यपणे एक सिलेंडर लावताच दुसर्‍याची बुकिंग केली जाते, जेणेकरून भरलेला गॅस सिलेंडर कोणत्याही वेळी तयार असावा. परंतु कधी-कधी असेही होते की, तुम्ही सिलेंडर बुक करण्यास विसरता.

 

बुकिंगचा मॅसेज

जर तुमच्या बाबतीत असे झाले असेल तर काही चिंता करू नका. आता गॅस सिलेंडर (LPG Cylinder) कंपनी तुम्हाला मॅसेज पाठवून अलर्ट करेल की, तुम्ही गॅस सिलेंडर बुक केला आहे किंवा नाही. (LPG Cylinder Booking)

 

Bharat Petroleum ची सर्व्हिस

भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) ने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट सर्व्हिस सुरू केली आहे. तुम्ही 15 दिवसानंतर आपला गॅस सिलेंडर बुक करू शकता. परंतु एखाद्या कारणामुळे तुम्ही सिलेंडर बुक करण्यास विसरला असाल तर भारत पेट्रोलयिम तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक व्हॉट्सअप मॅसेज पाठवून अलर्ट करेल.

 

WhatsApp मॅसेज अलर्ट

भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) द्वारे पाठवण्यात आलेला व्हॉट्सअप मेसेज काहीसा अशाप्रकारे असतो – हॅलो, तुमचा भारतगॅस सिलेंडर रिकामा आहे का? मी तुमचा सिलेंडर पुन्हा भरण्यासाठी मदत करू शकतो. खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.

 

मॅसेजवरून बुक करा गॅस सिलेंडर

या मॅसेजच्या खाली बुक माय सिलेंडर (Book My Cylinder) लिहिलेले असते. तुम्ही या मेसेजवर क्लिक करताच, तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल. गॅस सिलेंडर बुक (Gas Cylinder Online Booking) होताच तुमच्याकडे बुकिंग नंबरचा मॅसेज येतो. यामध्ये बुकिंग नंबरसह ग्राहक संख्या नंबर, तुमच्या गॅस एजन्सीचे नाव इत्यादी माहिती लिहिलेली असते. आणि लिहिलेले असते – तुमचा सिलेंडर लवकरच तुमच्याकडे डिलिव्हर केला जाईल. या मॅसेजच्या खाली गॅस सिलेंडरच्या पेमेंटचे अनेक पर्याय दिलेले असतात. तुम्ही याच मॅसजवरून गॅस सिलेंडरचे पेमेंट सुद्धा करू शकता.

 

करा ऑनाइन पेमेंट

येथे तुमच्या समोर गॅस सिलेंडरचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी पेटीएम लिंक (https://m.paytm.me/Bharatgas), अमेझॉन लिंक (www.amazon.in/lpg), गुगल पे लिंक (https://gpay.app.goo.gl/Bharatgas), फोनपे लिंक (https://www.phon.pe/lpg) आणि इतर लिंक (tinyurl.com/lpgbook) दिलेल्या असतात.

जर तुम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे ग्राहक असाल तर तुम्ही बुकिंग नंबर 7718955555 वर गॅस सिलेंडर बुक करू शकता.

 

Web Title :- LPG Cylinder Booking | online gas cylinder booking bharat gas cylinder online book gas cylinder price today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | वारकर्‍यांच्या दिंडीला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 20 जखमी, मावळ तालुक्यातील साते फाट्यावरील घटना

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून कोविडने मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत ! ‘ही’ कागदपत्रे बंधनकारक; जाणून घ्या नियम व अटी

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News