LPG Cylinder Cashback | ‘या’ अ‍ॅपने बुक करा गॅस सिलेंडर आणि मिळवा 50 रुपयांचा कॅशबॅक, या पध्दतीनं घ्या लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना काळात सामान्य जनता महागाईन त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेल, किराणा सामानापासून गॅस सिलेंडरपर्यंत सर्वच किंमती प्रचंड वाढल्या आहेत. अशावेळी लोक प्रत्येक पेमेंटवर कॅशबॅकच्या (LPG Cylinder Cashback) शोधात असतात. आम्ही एका अशा ऑफरबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांचा कॅशबॅक (LPG Cylinder Cashback) मिळेल. डिजिटल पेमेंटची सुविधा देणार्‍या पॉकेट अ‍ॅप (Pockets App) द्वारे ग्राहक गॅस सिलेंडरची बुकिंग करून 10 टक्के (कमाल 50 रुपये) कॅशबॅक मिळवू शकतात. हे अ‍ॅप आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) द्वारे संचालित आहे.

काय आहे ऑफर

– पॉकेट अ‍ॅपद्वारे जर तुम्ही 200 रुपये किंवा यापेक्षा जास्तच्या गॅस बुकिंगसह कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के पर्यंत कॅशबॅक मिळेल.

– ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रोमोकोडची आवश्यकता नाही.

– ही ऑफर पॉकेट्स अ‍ॅपद्वारे महिन्यांच्या 3 बिल पेमेंटवर मान्य राहील.

– तसेच प्रति तास केवळ 50 यूजर्सच ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

– बिल पेमेंट केल्यावर एक तासात तुम्ही कमाल 1 रिव्हार्ड/कॅशबॅक आणि महिन्यात 3 रिवॉर्ड/कॅशबॅक जिंकू शकता.

असे करा गॅससाठी बुकिंग –

1. आपले Pockets वॉलेट अ‍ॅप ओपन करा.

2. यात Recharge and Pay Bills सेक्शनमध्ये Pay Bills वर क्लिक करा.

3. नंतर Choose Billers मध्ये More च्या ऑपशनवर क्लिक करा.

4. यानंतर समोर LPG चा ऑपशन येईल.

5. आता सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा आणि मोबाइल नंबर टाका.

6. आता बुकिंग अमाऊंट सिस्टमद्वारे सांगितले जाईल.

7. यानंतर बुकिंग अमाऊंटचे पेमेंट करावे लागेल.

8. ट्रांजक्शननंतर ताबडतोब 10 टक्केच्या हिशेबाने कमाल 50 रुपये कॅशबॅक रिवॉर्ड मिळेल. हे उघडताच कॅशबॅक अमाऊंट पॉकेट्स वॉलेटमध्ये क्रेडिट केली जाईल.

हे देखील वाचा

SmartPhone | चिंताजनक ! स्मार्टफोनने 59 % मुले करताहेत ‘चॅटिंग’, 10 टक्केच विद्यार्थ्यांकडून अभ्यासासाठी वापर; स्टडी रिपोर्टमध्ये आश्चर्यकारक खुलासा

Pune Corporation | महापालिकेतील भाजप पदाधिकार्‍यांची ‘एकाधिकारशाही’? कार्यकर्त्यांची हाती ‘घड्याळ’ बांधायला सुरूवात, नगरसेवक शेवटच्या टप्प्यात करणार ‘करेक्ट’ कार्यक्रम?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LPG Cylinder Cashback | cashback offer of rs 50 on lpg cylinder booking icici pockets app

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update