LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   LPG सिलिंडरबरोबरच ग्राहकाला अनेक सुविधा मिळतात. तर प्रत्येक सिलेंडरवर विमा असल्याने, ग्राहकांच्या कुटूंबाला विमा दिला जातो. हा विमा तीन प्रकारचा असून तो ग्राहकाला मोफत दिला जातो. तसेच विम्याच्या माध्यमातून ग्राहक नुकसानीची भरपाई घेऊ शकतो. सिलेंडरचा काही तोटा झाला तर त्यावेळी विम्याचा वापर होतो. तर या विमा प्रकाराबाबत माहिती जाणून घ्या.

यामध्ये एक ते तीन प्रकारचे विमा असतात. विम्यामध्ये अपघाती मृत्यू, जखमी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास LPG कंपन्या नुकसान भरपाईचे काही पैसे ग्राहकांना देते. दरम्यान, विम्यामध्ये काही नियम आहेत. घटना कशी घडली आणि आणखी गोष्टींचा समावेश आहे. ३ प्रकारच्या विम्यात भरपाईची रक्कम वेगवेगळी असते. विम्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर त्याला जवळपास ६ लाख रुपयांचे संरक्षण असते. तर जखमी झालेल्यांसाठी ३० लाख रुपयांचा विमा आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत उपचार केले जातात. तसेच कोणतीही मालमत्ता गमावल्यास २ लाख रुपये दिले जातात.

कोणतेही शुल्क न घेता मिळणार विमा?

विम्याचे कोणतेही अधिक शुल्क द्यावे लागत नाही. तेल बाजारातील कंपन्या ग्राहकांकडून प्रीमियम रकमेसाठी कोणतेही शुल्क करत नाहीत. कोणतीही घटना घडल्यास विमा कंपन्या तेल कंपन्यांना ही रक्कम हस्तांतर करतात. तसेच आगामी २ वर्षांत सरकार देशातील लोकांना १ कोटी मोफत LPG कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे. त्याची तयारीही होत आहे. भारतातील प्रत्येक घरात LPG कनेक्शन मिळावे यासाठी सरकार उज्ज्वलासारखी योजना चालवित आहे. दरम्यान, सरकार अल्प दस्तऐवज मध्ये LPG कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. बदललेल्या नियमांमध्ये रहिवासी दाखला नसतानाही LPG कनेक्शन देण्याची योजना आहे अशी माहिती तरुण कपूर यांनी दिली आहे.