LPG Cylinder खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, गडबड असल्यास ‘या’ नंबरवर करा तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्याची डिलिव्हरी होते आणि घरी आलेल्या सिलेंडरचे सामान्यपणे तुम्ही सील चेक करून ठेवून घेता. परंतु, अनेकदा तुम्हाला नंतर असे वाटते की, सिलेंडरमध्ये गॅस कमी होता आणि डिलिव्हरी बॉयने काहीतरी गडबड केली होती. मात्र, त्यावेळी तुमच्या हातात काहीही नसते आणि पश्चाताप होतो.

अशा स्थितीपासून वाचण्यासाठी जागृत व्हावे लागेल. घरात नवीन सिलेंडर आल्यानंतर तुम्ही त्याचे सील चेक करण्यासह वजनसुद्धा तपासू शकता. घरी येणार्‍या एका स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये 14.2 किलोग्रॅम गॅस असतो आणि सिलेंडरचे वजन 15.3 किलोग्रॅम असते. अशाप्रकारे एका भरलेल्या सिलेंडरचे वजन 29.5 किलो भरले पाहिजे. तुमच्या घरी आलेल्या सिलेंडरचे वजन यापेक्षा कमी असेल तर तुम्ही डिलिव्हरी बॉयविरूद्ध तक्रार केली पाहिजे. ही माहिती सिलेंडरवर सुद्धा लिहिलेली असते.

कुठे करावी तक्रार

जर गॅस सिलेंडरचे वजन 29.5 किलोपेक्षा 150 ग्रॅम कमी किंवा जास्त आहे, तर डिलिव्हरी बॉयकडून सिलेंडर घेऊ नका आणि टोल फ्री नंबर 1800-2333-555 वर कॉल करून आपली तक्रार नोंदवा.