LPG Cylinder | स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरला एक्सपायरी डेट असते? IOCL नं जारी केली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर (LPG Cylinder) वापरत असाल तर ते खरंच वापरण्यायोग्य आहे की नाही हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य ती माहिती वेळीच जाणून घेतली नाही तर तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. अनेकवेळा गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) सुरक्षेबाबत अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. ऑईल मार्केटिंग कंपनी (Oil marketing company) आयओसीएल (IOCL) ने ग्राहकांचे हे प्रश्न लक्षात घेऊन अत्यंत महत्त्वाची माहिती (Important information) जारी केली आहे. या माहितीमुळे तुमच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

 

IOCL नं दिली माहिती
IOCL ने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली की, सर्व एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) एक खास स्टील आणि प्रोटेक्टिव्ह कोटिसंगसह तयार करण्यात येते. याची मॅन्युफॅक्चरिंग BIS 3196 अंतर्गत करण्यात येते. ज्या मॅन्यूफॅक्चर्सना चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्हची (Chief Controller of Explosives) मान्यता असते, फक्त त्यांना सिलेंडर तयार करण्याची मान्यता असते.

 

अशी तपासा एक्सपायरी डेट
सिलेंडरच्या एक्सपायरी डेटबाबत (cylinder Expiry date) परिपत्र 2007 चे असले तरी कंपनीने असे सांगितले की, ज्या वस्तू विशिष्ट वेळेत नाश पावणार आहेत, त्यांची एक्सपायरी डेट असते. LPG सिलेंडरसंदर्भात सांगायचे झाले तर, सिलेंडर तयार करताना अनेक बाह्य आणि अंतर्गत पॅरामीटर्सद्वारे निर्धारीत करण्यात आलेले असतात. त्यानुसारच सिलेंडर तयार केले जातात. त्यामुळे त्याची एक्सपायरी डेट नसते. मात्र, प्रत्येक सिलेंडरची एका विशिष्ठ (Specific) कालावधीनंतर टेस्टिंग करण्यात येते.

सिलेंडरवरील कोडबाबत जाणून घ्या
LPG सिलेंडरची वैधानिक चाचणी आणि पेटिंगसाठी वेळ निश्चित केली जाते.
तसेच पुढच्या चाचणीची तारीख देखील एका कोडमध्ये लिहलेली असते.
त्या कोड नुसार पुढच्या चाचणीच्या तारखेवेळी सिलेंडर चाचणीसाठी (cylinder testing) पाठवले जातात.
उदा. A 2022 म्हणजे 2022 वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सिलेंडर चाचणीसाठी पाठवला जाणार.
अशाच प्रकारे B 2022 म्हणजे 2022 वर्षाच्या दुसरी तिमाही, C 2022 म्हणजे 2022 वर्षाची तिसरी तिमाही
आणि D 2022 म्हणजे 2022 वर्षाची चौथी तिमाहीत सिलेंडर चाचणीसाठी पाठवला जाणार.

 

तुम्हाला सिलेंडर संदर्भात आणखी माहिती हवी असेल तर इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला https://iocl.com/pages/indane-cooking-gas-overview या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

 

Web Title :- LPG Cylinder | lpg cylinder expiry date full information is here know about it marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 569 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMFBY | शेतकर्‍यांनी रब्बी पिकाचा 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावा विमा, अन्यथा मिळणार नाही लाभ

Team India South Africa Tour | द. आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का ! रोहित शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर; प्रियांक पांचालला संधी