LPG Cylinder | जर गॅस सिलेंडरने घडली असेल दुर्घटना तर मिळेल 50 लाख रुपयांची भरपाई, जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या काळात गॅस सिलेंडर (Gas Cylinder) सर्वांच्याच घरात असतो. याचा वापर खुपच सावधगिरीने करावा लागतो, कारण एक छोटी चूक मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की एलपीजी वापरताना कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे आणि दुर्घटना घडल्यावर काय करावे. सोबतच हे सुद्धा माहिती असावे की जर गॅस सिलेंडरचा (LPG Cylinder) स्फोट झाला किंवा गॅस लीक झाल्याने दुर्घटना घडली तर एक ग्राहक या नात्याने तुमचे कोणते अधिकार आहेत.

 

50 लाख रुपयांपर्यंत इन्श्युरन्स

 

LPG म्हणजे स्वयंपाकांचे गॅस कनेक्शन (LPG Cylinder) घेतल्यास पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर उपलब्ध देतात. 50 लाख रुपयांपर्यंतचा हा इन्श्युरन्स एलपीजी सिलेंडरमधून गॅस लीकेज किंवा ब्लास्टमुळे दुर्घटनेत आर्थिक मदत म्हणून दिला जातो.

 

यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांसोबत भागीदारी असते. भरपाईची जबाबदारी गॅस कंपनीची असते. दुर्घटनेत ग्राहकाच्या प्रॉपर्टी/घराचे नुकसान झाले तर प्रति अ‍ॅक्सीडेंट 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्श्युरन्स क्लेम मिळतो. एक व्यक्तीला कमाल 10 लाख भरपाई दिली जाऊ शकते.

 

जाणून घ्या गॅस सिलेंडरवर कसा मिळेल 50 लाखांचा क्लेम

 

  • एका दुर्घटनेवर कमाल 50 लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते. दुर्घटनेतील पीडित प्रत्येक व्यक्तीला कमाल 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते.
  • LPG सिलेंडरचे विमा कव्हर मिळवण्यासाठी दुर्घटनेची माहिती ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला आणि एलपीजी वितरकाला द्यावी लागते.
  • ही विमा पॉलिसी ग्राहकाच्या व्यक्तीगत नावाने नसते.
  • कंपनी च्या वितरकांनी घेतलेल्या पॉलिसीत प्रत्येक ग्राहक कव्हर होतो. यासाठी ग्राहकाला प्रीमियम नाही.
  • FIR ची कॉपी, जखमींच्या उपचाराच्या पावत्या आणि मेडिकल बिले तसेच मृत्यू झाल्यास पोस्टमार्टेम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवा. (LPG Cylinder)

 

Web Title : LPG Cylinder | lpg gas cylinder insurance cover rupees 50 lakh know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | ‘पूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी घेतलेली संमती भविष्यातही लागू होणार नाही’ – हाय कोर्ट

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले ‘मालामाल’, महिनाभरात दिला मल्टीबॅगर रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Pune Crime | पुणे शहरातील विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या दोन बनावट जामीनदार देणार्‍या टोळ्या गजाआड, गुन्हे शाखेची मोठी कारवाई