LPG Cylinder Price | तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील 1000 रुपये ! जाणून घ्या मोदी सरकारची योजना?

नवी दिल्ली : LPG Cylinder Price | केंद्र सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनात (Internal Assessment) संकेत मिळत आहे की सबसिडी पाहिजे असेल तर एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रति सिलेंडर 1,000 रुपये मोजावे (LPG Cylinder Price) लागतील. तसेच केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी (LPG cylinder Subsidy) पूर्णपणे बंद करू शकते. मात्र यावर मोदी सरकारने (Modi Government) स्पष्टपणे काहीही म्हटलेले नाही.

मोदी सरकारने एलपीजी सिलेंडरवर सबसिडीच्या मुद्द्यावर अनेकदा चर्चा केली आहे. परंतु अजूनपर्यंत कोणतीही योजना बनवण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार सरकारकडे 2 पर्याय आहेत. पहिला, विना सबसिडीच्या सिलेंडरचा पुरवठा करणे आणि दुसरा, एक हजार रूपये किंमत (LPG Cylinder Price) करून काही ग्राहकांना किमतीमधील सवलतीचा फायदा जारी ठेवण्यात यावा.

काय करू शकते सरकार?

एलपीजी सिलेंडरवर सबसिडीबाबत सरकारकडून काहीही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. रिपोर्टनुसार सध्या 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा नियम लागू ठेवला जाईल. याशिवाय उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ जारी राहील.

तर, इतर लोकांसाठी सबसिडी बंद होऊ शकते. ही योजना 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून गरीबी रेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन (LPG connection) देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. भारतात जवळपास 29 कोटीपेक्षा जास्त एलपीजी कनेक्शनमध्ये उज्ज्वला योजना अंतर्गत सुमारे 8.8 कोटी आहे.

सबसिडी बंद आहे

मे 2020 पासून दुर्गम भाग आणि एलपीजी प्लांटपासून दूर असलेले ग्राहक वगळता अनेक क्षेत्रातील एलपीजी सबसिडी बंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

ST Workers Strike | पुण्यात ‘लाल परी’ला लागला ब्रेक ! विभागातील ST ची सर्व वाहतूक ठप्प; दिवाळीनंतर परत गावी जाणार्‍यांचे हाल सुरु

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  lpg cylinder price may rs  1000 know new lpg subsidy plan of modi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update