LPG Cylinder Price | उद्यापासून स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो आणखी महाग, आज बुक केल्यास मिळेल थोडा दिलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Cylinder Price | सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. विशेषत: इंधनाच्या बाबतीत कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. वास्तविक, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. उद्या भावात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (LPG Cylinder Price)

 

1 जूनपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीसह अनेक बदल होणार आहेत. एलपीजी सिलिंडर पुन्हा एकदा महाग होण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. (LPG Cylinder Price)

 

1 जूनपासून किमतीत बदलाची शक्यता
अशावेळी, जर तुम्हाला वाढलेल्या किमतीपासून दिलासा हवा असेल, तर आजच तुमचा एलपीजी सिलिंडर बुक करा, आज बुक केल्यास तुम्हाला नवीन दर किमान या महिन्यात तरी द्यावा लागणार नाही. याआधी 19 मे रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 3.50 रुपयांची वाढ केली होती.

सध्या दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Price Delhi) रु 1003 आहे. मुंबईत घरगुती एलपीजीची किंमत 1002.50 रुपये प्रति सिलेंडर आहे. तर, कोलकातामध्ये, ग्राहकाला एलपीजी सिलिंडरसाठी 1,029 रुपये मोजावे लागतात. त्याच वेळी, चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 1,058. 50 रुपये आहे.

मे महिन्यात दुप्पट वाढ
मे महिन्यात स्वयंपाकांच्या सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांना दोनदा महागाईचा फटका बसला आहे. 7 मे रोजी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत अचानक 50 रुपयांनी वाढवली. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 3.50 रुपये प्रति सिलेंडर वाढवण्यात आले.

मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 मे रोजी वाढवण्यात आल्या होत्या. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2,355. 5 रुपयांपर्यंत वाढले. त्याच वेळी, 5 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे.

 

Web Title :-  LPG Cylinder Price | lpg cylinder price review 01 june 2022 may hike the cooking gas rate

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा