LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग, आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

नवी दिल्ली : LPG Cylinder Price | घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसात विना-अनुदानित एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज म्हणजे एक सप्टेंबरला 25 रुपयांची वाढ करण्यात आली (LPG Cylinder Price) आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी 18 ऑगस्टला गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये झाली आहे.

प्रमुख शहरात अशा वाढल्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमती

महीनादिल्लीकोलकातामुंबईचेन्नई
सप्टेंबर 1, 2021884.5911884.5900.5
ऑगस्ट 18, 2021859.5886859.5875
ऑगस्ट 1, 2021834.5861834.5850
जुलै 1, 2021834.5861834.5850
जून 1, 2021809835.5809825
मे 1, 2021809835.5809825
एप्रिल 1, 2021809835.5809825
मार्च 1 , 2021819845.5819835
फेब्रुवारी 25 , 2021794820.5794810
फेब्रुवारी 15 , 2021769795.5769785
फेब्रुवारी 4 , 2021719745.5719735
जानेवारी 1 , 2021694720.5694710
डिसेंबर 15 , 2020694720.5694710
डिसेंबर 02 , 2020644670.5644660
नोव्हेंबर 01 , 2020594620.5594610
ऑक्टोबर 01 , 2020594620.5594610
ऑगस्ट 01, 2014920964.5947922
जानेवारी 1, 2014124112701264.51234

स्त्रोत : IOC

जुलै आणि ऑगस्टमध्ये दर वाढले होते. मे  आणि जूनमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती. दिल्लीत यावर्षी जानेवारीत एलपीजी सिलेंडरचा दर 694 रुपये होता, जो फेब्रुवारीत वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला. 15 फेब्रुवारीला दर वाढवून 769 रुपये करण्यात आले. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर 794 रुपये करण्यात आला. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची प्राईस 819 रुपये केली गेली.

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी ‘धो-धो’

Pune News | सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ करणार बलात्कारग्रस्तांना कायदेविषयक मदत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : LPG Cylinder Price | lpg cylinder price without subsidy becomes expensive on september 1 now gas will be available at this rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update