LPG Cylinder Price | LPG गॅस सिलिंडर 83 रुपयांनी स्वस्त, Gas Cylinder च्या दरात कपात; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Cylinder Price | वाढत्या महागाईच्या काळात गॅस सिंलेडरच्या किंमतींनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला सरकरी कंपन्यांकडून नवे दर जारी केले जातात. आज जून महिन्यच्या पहिल्या दिवशीही तेल कंपन्यांनी नवे दर जाहीर केले आहेत. यामध्ये व्यवसायिकांना दिलासा देणारे हे नवे दर आहेत. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी या जून महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. छोटे व्यावसायिक, हॉटेलमालकांकडून वापरण्यात येणाऱ्या या व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 83.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू होतील. (LPG Cylinder Price)

 

देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत (Delhi) व्यावसायिक सिलिंडरची (Commercial LPG Cylinder) किंमत 83.50 रुपयांनी कमी झाली असून आता तो 1773 रुपयांवर आला आहे. तर दिल्लीत मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती आणि आजही ती तेवढीच आहे.

 

 

 

देशातील अनेक राज्यांमध्ये हे नवे दर लागू करण्यात आले असून यांमुळे व्यवसायिकांचा बोजा हलका झाला आहे. काही मह्त्त्वपूर्ण शहरातील किंमती जाणून घेऊया. कोलकातामध्ये (Kolkata) सिलिंडर 85 रुपयांनी स्वस्त झाला असून, तो आता 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांवर आला आहे. मुंबईत (Mumbai) सिलेंडरची किंमत 83.50 रुपयांनी कमी होऊन, सिलेंडर 1808.5 रुपयांवरून 1725 रुपयांवर झाला आहे. चेन्नईमध्ये (Chennai) 84.50 रुपयांनी स्वस्त होऊन 2021.50 रुपयांवरून 1937 रुपयांवर आला आहे. इंदूरमधील (Indore) व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1877 रुपयांना मिळतोय तर पाटण्यात (Patna) 19 किलोच्या निळ्या LPG सिलिंडरची किंमत 2037 रुपये आहे.

दर महिन्याला हे नवे दर जारी होतात आणि पुढे महिनाभर ते लागू केले जाते. महिन्यच्या एक तारखेला लागू होणाऱ्या
या दरांकडे साऱ्यांचे (LPG Cylinder Price) लक्ष असते. खास करून गृहिणींचे लक्ष लागलेले असते.
मात्र या महिन्यात फक्त व्यवसायिकांना दिलासा मिळाला असून घरगुती गॅसच्या (Domestic Gas Cylinder)
किंमती कमी न झाल्याने गृहिणींची निराशा झाली आहे.

 

Web Title :  LPG Cylinder Price | Reduction in LPG gas cylinder rates lpg cheaper by 83 rupees
1 st june 2023 Commercial LPG Cylinder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा