LPG Cylinder Rate | ‘एलपीजी’ सिलेंडरच्या दरात आज वाढ झाली की घट, जाणून घ्या 1 फेब्रुवारी ‘बजेट- डे’च्या दिवशी नवीन दर

नवी दिल्ली – LPG Cylinder Rate | आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर होण्यापूर्वी एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूका पाहता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG Cylinder Rate) दिलासा देण्यात येत आहे. हे तेव्हा होत आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. (LPG Cylinder Rate)

 

एक फेब्रबुवारीला दिल्लीत विना अनुदानित इंडेन घरगुती सिलेंडरचा दर आता 899.50 रुपये झाला आहे. तर, कोलकातामध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 926 रुपयात मिळेल. तसेच मुंबईत सुद्धा 899.50 रूपये सिलेंडरचा दर असेल. चेन्नईत याची किंमत 915.50 रुपये आहे.

 

निवडणुकांमुळे दरवाढ नाही

ऑक्टोबरपासून आतापर्यंत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तसेच पेट्रोल-डिझेलचे दरसुद्धा स्थिर आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. 10 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत मतदान आहे आणि निकाल 10 मार्चला येतील. अशावेळी खुप कमी शक्यता आहे की, घरगुती सिलेंडरचे दर वाढवले जातील. कमर्शियल सिलेंडरच्या दरात काही बदल होऊ शकतात.

 

निवडणुकीनंतर वाढणार दर

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीने होणार्‍या नुकसानीची भरपाई पाच राज्यातील निवडणुकीनंतर होऊ शकते. जाणकारांनुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरात 5 रुपयांची वाढ होऊ शकते. तर एलपीजी सिलेंडर 100 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतो.

 

सप्टेंबर 2021 पासून जानेवारी 2022 च्या दरम्यान एलपीजी घरगुती सिलेंडर केवळ 15 रुपयांनी महागला आहे.
एक सप्टेंबर 2021 ला दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 884.50 रुपये होता,
6 ऑक्टोबरला तो 15 रुपये वाढून 899.50 रुपये झाला. 6 ऑक्टोबरनंतर यामध्ये कोणताही बदल झालेला नाही,
मात्र या दरम्यान कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

 

Web Title :- LPG Cylinder Rate | Lpg cylinder price increase or decrease check new rates on february 1 budget day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा