LPG Cylinder Subsidy | प्रत्येक महिन्याला बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सबसीडी जमा होतेय? असं करा चेक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Cylinder Subsidy | मागील काही महिन्यापासून LPG गॅस सिलेंडरच्या दरात चढउतार पाहायला मिळालं. मात्र सिलेंडरचा दर वाढत असल्याचे दिसते. दरम्यान केंद्र सरकार (Central Government) अनुदानित सिलेंडरवर सबसिडी (LPG Cylinder Subsidy) देत त्याचा लाभ थेट ग्राहकांच्या बँकेत जमा करत असते. याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) बँक खात्यांशी जोडलं असणे आवश्यक असते. यानंतरच संबधित ग्राहकांच्या खात्यात सबसीडी जमा होते.

दरम्यान, प्रत्येक राज्यातील LPG सिलेंडरवर मिळाणारी सबसीडी रक्कम ही वेगवेगळी आहे. एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास याचा लाभ मिळत नाही. दरम्यान, ग्राहकांच्या खात्यात सबसीडी जमा होते की नाही? हे तुम्ही ऑनलाइनद्वारेही जाणून घेऊ शकता. (LPG Cylinder Subsidy)

 

 

LPG स्टेटस ऑनलाइन चेक करण्यासाठी सोपा मार्ग –

http://mylpg.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

– एलपीजी सर्व्हिस प्रोव्हाइडरची निवड करा व जॉइन डीबीटीवर क्लिक करा.

– तुमच्याकडे आधार नंबर नसल्यास DBTL ऑप्शनसाठी इतर आयकॉनवर क्लिक करा.

– नंतर एलपीजी प्रोव्हाइडरच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

– येथे कंम्प्लेंट बॉक्स ओपन होईल, ज्यात सबसीडी स्टेट्सची माहिती द्यावी लागेल.

– नंतर सबसीडी संबधित पर्यायावर क्लिक करा.

– सबसीडी नॉट रिसिव्हड या पर्यायावर क्लिक करा.

– 2 पर्यायांसह 1 डायलॉग बॉक्स होईल. यात नोंदणी मोबाइल नंबर आणि LPG आयडीचा पर्याय असेल.

– तुम्हाला उजव्या बाजूला दिलेल्या जागेत १७ आकडी LPG आयडी टाकावा लागणार आहे.

– नंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर व कॅप्चा कोड टाकून क्लिक करा.

– तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

– पुढील पेजवर गेल्यानंतर तुमचा Email ID टाकून पासवर्ड क्रिएट करा.

– Email ID वर एक अ‍ॅक्टिव्हेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा.

– नंतर अकाउंट सुरू होईल.

– पुन्हा http://mylpg.in अकाउंटमध्ये लॉगइन करा.

– पॉपअप विंडोमध्ये LPG अकाउंटशी लिंक असलेल्या आधार कार्डसह बँकेची माहिती द्या.

– व्हेरिफिकेशन नंतर रिक्वेस्ट सबमिट करा.

– व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सबसिडी ट्रान्सफर वर टॅप करा.

 

 

Web Title :- LPG Cylinder Subsidy | have you received your lpg gas subsidy here is how to check

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahapur Nagar Panchayat Election | शहापूर नगर पंचायत निवडणूक ! शिवसेना उमेदवाराच्या पराभवासाठी जादूटोणा; परिसरात उडाली खळबळ

 

CM Uddhav Thackeray | ‘महाविकास आघाडीतील नेते मला खांद्याला खांदा लावून साथ देतायत’

 

Coronavirus in Pune | पुणे शहरात कोरोना बाधितांपैकी फक्त 4 टक्के रुग्ण रुग्णालयात