LPG Cylinder Subsidy | LPG सिलेंडरवर तुम्हाला पुन्हा मिळू शकते सबसिडी, सरकारने तयार केला ‘मास्टर’ प्लॅन

नवी दिल्ली : LPG Cylinder Subsidy | एलपीजी सबसिडी (LPG Cylinder Subsidy) बाबत महत्वाची बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय (Ministry of Petroleum and Natural Gas) त्या मर्यादेचे मुल्यांकन करत आहे ज्यावर द्रव पेट्रोलियम गॅस (LPG or cooking gas) वर सबसिडी सुरू करता येईल. बिझनेस स्टँडर्डने मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या संदर्भाने सांगितले की, यासाठी एक सर्वे केला जात आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यानुसार, यावेळी सर्वे केला जात आहे की कोणत्या जास्तीत जास्त किमतीवर ग्राहक घरगुती सिलेंडर खरेदी (LPG Cylinder Subsidy) करतील. अधिकार्‍यानुसार, यासाठी अनेक प्रकारच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.
यापैकी एक पर्याय हा आहे की, सबसिडी वितरण (subsidy disbursal) केवळ पंतप्रधान उज्ज्वला योजना (PMUY) लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवले जावे.

मे 2020 बंद केली आहे सबसिडी

2020 मध्ये जेव्हा कोरोना व्हायरस महामारीमुळे लॉकडाऊननंतर कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या होत्या.
यातून भारत सरकारला एलपीजी सबसिडीच्या बाबतीत मदत मिळाली कारण किमती कमी होत्या आणि सबसिडीबाबत बदलाची आवश्यकता नव्हती.

सरकारने मे 2020 मध्ये LPG वर सबसिडी बंद केली होती. त्यावेळी दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 581.50 रुपये होती. सध्या त्याची किंमत 884.50 रुपयांवर पोहचली आहे.

30 रुपयांपेक्षा सुद्धा कमी सबसिडी

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती सिलेंडरवर सबसिडी शून्य आहे, परंतु केंद्र अजूनही काही राज्यांमध्ये फ्रेट कॉस्ट्सच्या रूपात सबसिडी देत आहे.
प्रत्येक बाबतीत सबसिडीची योग्य मात्रा वेगवेगळी असते, परंतु ती मोठ्या प्रमाणात 30 रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार सबसिडीबाबत सर्वे करत आहे, यातून हा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे की, कोणत्या जास्तीत जास्त रेटवर ग्राहक एलपीजी सिलेंडर खरेदी करू शकतात.
म्हणजे सरकारला ग्राहकांकडून घेतलेलेच जादाचे पैसे सबसिडी म्हणून देता येतील.

पीएमयूवाय लाभार्थ्यांना (PMUY beneficiaries) आर्थिकदृष्ट्या सर्वात कमजोर मानले जाते, यासाठी एका पर्यायावर विचार केला जात आहे की, केवळ त्यांनाच एखादी नवीन सबसिडी दिली जावी.
देण्यात येणार्‍या सबसिडीचे प्रमाण आणि सबसिडी एलपीजी सिलेंडरच्या प्रभावी किमती बाबत सर्वेक्षणाचे निकाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

पेट्रोलियम प्रॉडक्टवर सबसिडी 92% पर्यंत कमी झाली

एप्रिल-जुलैच्या कालावधीत वार्षिक आधारावर पेट्रोलियम प्रॉडक्ट सबसिडीमध्ये 92% ची घसरण पहायला मिळाली आहे.
याचे कारण पाहिले तर सरकारने कुकिंग इंधनाच्या किमतीत मोठी वाढ करूनही एलपीजी सिलेंडरवर मिळणारी सबसिडी लाखो ग्राहकांच्या खात्यात ट्रान्सफर करणे बंद केले आहे.

2021-22 पूर्वी 4 महिन्यात पेट्रोलियम प्रॉडक्ट सबसिडी 1,233 कोटी रुपयांवर राहण्याचा अंदाज होता.
जी मागील वर्षी म्हणजे 2020-21 च्या याच कालावधीत 16,461 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

हे देखील वाचा

Ahmednagar Crime | शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे ‘कडक’ फोटो काढले, ‘मॉर्फ’ करून ‘अश्लील’ छायाचित्रे व्हायरल, अल्पवयीन पोरांचं ‘कांड’

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LPG Cylinder Subsidy | lpg cylinder govt assessing appropriate price at lpg gas subsidy should resume check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update