LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येतील पैसे?

नवी दिल्ली : LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या सबसिडी (LPG cylinder Subsidy) बाबत मोठी माहिती समोर येत आहे. सरकारच्या एका अंतर्गत मूल्यांकनात (Internal Assessment) संकेत मिळत आहेत की, एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रति सिलेंडर 1,000 रुपये भरावे लागू शकतात. मात्र, यावर सरकारचा विचार काय आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

 

मीडिया रिपोर्टनुसार, सरकारने सबसिडीच्या मुद्द्यावर अनेकदा चर्चा केली आहे परंतु अजूनपर्यंत योजना बनवलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार सरकारकडे 2 पर्याय आहेत. पहिला विना सबसिडीचा सिलेंडर पुरवठा करणे. दुसरा, काही ग्राहकांना सबसिडीचा लाभ देणे.

 

जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लान?

सबसिडी देण्याबाबत सरकारकडून काहीही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. रिपोर्टनुसार, अजूनपर्यंत 10 लाख रुपये इन्कमचा नियम लागू ठेवला जाईल आणि उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ मिळेल. इतरांसाठी सबसिडी रद्द केली जाऊ शकते.

 

सबसिडीची काय स्थिती आहे?

2020 मध्ये जेव्हा कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता.
त्यावेळी कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड घसरल्या.
यात भारत सरकारला एलपीजी सबसिडी च्या बाबतीत मदत मिळाली कारण किमती कमी होत्या आणि सबसिडीबाबत बदलाची आवश्यकता नव्हती.
मे 2020 पासून अनेक क्षेत्रात एलपीजी सबसिडी बंद झाली आहे.

 

Web Title :-LPG Cylinder Subsidy | lpg gas cylinder subsidy consumer ready to pay 1000 rupees per cylinder govt make new plan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा