कामाची गोष्ट ! तुमच्याकडे नसेल ‘हा’ 4 डिजिटचा Code तर मिळणार नाही LPG Cylinder ! जाणून घ्या का?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुमच्याकडे सुद्धा इंण्डेनचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंडियन ऑईल कंपनीने ट्विट करून आपल्या ग्राहकांना डीएसीबाबत माहिती दिली आहे. हा डीएसी नंबर काय आहे आणि त्याचे फायदे कोणते आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? जेव्हा तुम्ही सिलेंडर मागवाल तेव्हा हा नंबर तुम्हाला आवश्यक आहे. या नंबरबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

या नंबरद्वारे सिलेंडर तुमच्या घरी डिलिव्हर होतो. या नंबरची आवश्यकता तुमचा सिलेंडर रिफिल करण्यासाठी असते. या नंबरमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या नंबरशिवाय सिलेंडर मिळणार नसल्याने तो आवश्यक आहे.

आयओसीने केले ट्विट
इंडियन ऑईलने ट्विट करून या नंबरबाबत माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, तुम्हाला माहित आहे का जेव्हा तुम्ही तुमच्या इण्डेन सिलेंडरच्या रिफिलसाठी बुक करता तेव्हा नेहमी एक युनिक डीएसी जनरेट होतो. डिलिव्हरी प्रोसेस पूर्ण करण्यासाठी डीएसी डिलिव्हरी बॉयला हा कोड सांगा. तुमच्या चांगल्या सेवत आमची मदत.

या कोडचे फायदे काय आहेत?
जर ग्राहकाकडे हा कोड नसेल तर त्यास सिलेंडर मिळणार नाही. कोड मिळाल्यानंतरच तुम्हाला सिलेंडर मिळेल. या कोडमुळे सप्लायर्स तो ब्लॅकमध्ये विकू शकणार नाहीत. तुमच्या सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी हा कोड मिळतो.