LPG Cylinder Update | जुन्या LPG सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, किंमत जवळपास सारखीच; जाणून घ्या फायदे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LPG Cylinder Update | आता लवकरच एलपीजीच्या अवजड गॅस सिलेंडरपासून तुमची सुटका होऊ शकते. आता लोखंडाचा सिलेंडर बदलण्यासाठी फायबर ग्लास कम्पोझिट एलपीजी सिलेंडर (fiberglass composite LPG cylinder Update) लाँच करण्यात आला आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्य हे आहे की याचे वजन जुन्या पारंपरिक सिलेंडरपेक्षा 50 टक्के (weights 50 percent less) कमी आहे.

याशिवाय लोकांना तो कमी किमतीत मिळेल आणि जुन्या सिलेंडरच्या बदल्यात तो घेता येईल.
फायबर ग्लासने बनवलेला हा सिलेंडर जुन्या सिलेंडरपेक्षा जास्त सुरक्षित आणि पारदर्शक (safer and more transparent) आहे.

कंपोझिट सिलेंडर केवळ 16 किलोचा

हा सिलेंडर पूर्णपणे पारदर्शक असेल आणि त्याचे वजन केवळ 6 किलो असेल त्याची संरचना दिसण्यास आकर्षक असेल.
यामध्ये अनेक रंगाचे सिलेंडर मिळतील.
गॅस असलेल्या जुन्या सिलेंडरचे वजन 31 किलो असते, तर कंपोझिट सिलेंडर केवळ 16 किलोचा असेल.
कमी वजनामुळे महिला तो सहजपणे उचलू शकतील. फायबरचा असल्याने तो जंगरोधक आहे.

काय असेल किंमत :

10 किलो आणि 5 किलोमध्ये कंपोझिट गॅस सिलेंडर मिळेल 10 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 692 रुपये असेल.
तर 5 किलोसाठी 363 रुपये द्यावे लागतील.
या दोन्हीला जुनेच रेग्युलेटर लावलेले असतील. गॅस किती शिल्लक आहे हे बाहेरून दिसेल
10 किलोच्या सिलेंडरमध्ये जुन्या सिलेंडरच्या तुलनेत सुमारे 4 किलो कमी गॅस मिळेल.

 

28 शहरात मिळणार हा सिलेंडर :

शनिवारी (25 सप्टेंबर) खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी ओमेक्स सिटीमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (ioc) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात हा सिलेंडर लाँच केला.
पहिल्या टप्प्यात तो दिल्ली, गुरुग्राम, बनारस, फरीदाबाद, प्रयागराज, जयपुर, हैद्राबाद, पाटणा, मैसूर, जालंधर, जमशेदपुर, लुधियाना, रायपुर, रांची, अहमदाबादसह 28 शहरात मिळेल.

इतकी असेल किंमत (new composite LPG cylinder price)

सिलेंडर वितरण कंपनी इण्डेन (Inden) ने माहिती देताना सांगितले की, नवीन कंपोझिट गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांना 10 किलोसाठी 3350 रुपये आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी 2150 रुपये द्यावे लागतील. (LPG Cylinder Update)

 

Web Title : LPG Cylinder Update | lpg cylinder update change your old lpg cylinder with composite fiber glass cylinder know its benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | सेवा हमी कायद्यानुसार महापालिका येत्या डिसेंबरपासून आणखी 30 सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार

Taljai Development Project | तळजाई विकास प्रकल्पाला केला जाणारा विरोध हा दुर्दैवी ! प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर यांचे मत

Harmful Effects of Nail Polish | जीवघेणे ठरू शकते नेलपेंट लावणे, जाणून घ्या यामुळे होणारे गंभीर नुकसान