LPG Cylinder Price : सर्वसामान्यांना मोठा झटका ! जानेवारी महिन्यात गॅस सिलेंडर महागला, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी जानेवारी महिन्याच्या गॅसच्या किंमती जारी केल्या आहेत. कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात स्वयंपाकांचा गॅस म्हणजेच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दोन वेळा वाढ करून 100 रुपयांनी दर वाढवला. आता विना अनुदानित स्वयंपाकाचा गॅस दिल्लीत प्रति सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) 694 रुपयात विकला जात आहे. मात्र, जानेवारी महिना आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) विना अनुदानित 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही आणि दर 694 रुपयांवर स्थिर आहे. मात्र, कमर्शियल सिलेंडरच्या दरात 56 रुपयांची वाढ केली आहे.

19 किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर महागला
– देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,332 रुपयांवरून वाढून 1,349 रुपये झाली आहे. 19 किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर 17 रुपयांनी महागला आहे. 14.2 किलोगॅम सिलेंडरची किंमत 694 रुपये आहे.

– कोलकातामध्ये 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,387.50 रुपयांवरून वाढून 1,410 रुपयांवर आली आहे. येथे किमतीत 22.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. येथे घरगुती गॅसची किंमत 720.50 रुपये आहे.

– मुंबईत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,280.50 रुपयांनी वाढून 1,297.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहचली आहे. येथे किमतीत 17 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये आहे.

– चेन्नईत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,446.50 रुपयांवरून वाढून 1,463.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. येथे किमतीत 17 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. येथे 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 710 रुपये आहे.