‘सिलेंडर’ची सेवा देण्यात ‘हलगर्जी’ केल्यास डिस्ट्रीब्युटरला पडणार महागात, कापले जाणार ‘कमिशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांना LPG गॅसची उत्तम सेवा देण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. जर तुमचा एलपीजी गॅस डिस्ट्रीब्युटर तुम्हाला उत्तम सेवा देत नसेल तर तुम्ही त्याची तक्रार करु शकता. कारण तुमच्या तक्रारीनंतर डिस्ट्रीब्युटरला आर्थिक दंड करण्यात येईल. HPCL, BPCL आणि IOC कडे गॅस संबंधित तक्रारी रोज येत आहेत. त्यामुळे कंपनीकडुन मोठी पावले उचलली जाणार आहेत.

ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला एक प्रस्ताव दिला आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की एलपीजी डिस्ट्रीब्युटरचे जे स्ट्रक्चर आहे त्यात बदल करण्यात यावा. त्याला फिक्स्ड ठेवण्यासाठी व्हेरिएबल तयार करण्यात यावेत. त्यामुळे यात ग्राहकांची भूमिका वाढेल.

ऑइल कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला प्रस्ताव दिला आहे, त्यानुसार ड्रिस्ट्रीब्युटर सर्व्हिसला डिस्ट्रीब्युशन कमिशन लिंक केले जावे. त्याअंतर्गत फीडबॅक कमीशन देण्याचा आधार बनेल.

डिस्ट्रीब्युटरच्या कमिशनमध्ये होणार कपात
सध्याच्या स्ट्रक्चरनुसार फिक्स्ड कमिशन 60 रुपये आहे. जो प्रस्ताव देण्यात आला आहे त्यानुसार याला 80 टक्के आणि 20 टक्के प्रमाणात विभाजित करण्यात येईल. म्हणजेच 80 टक्के कमिशन फिक्स्ड असेल आणि 20 टक्के कमिशन ग्राहकांच्या फीडबॅकवर आधारित असेल. म्हणजेच डिस्ट्रीब्युटर चांगली सेवा देईल तर ग्राहकांकडे याचा आधिकार असेल तरी त्यांनी फिडबॅक द्यावा. रेटिंगची प्रक्रिया ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी तयार केली आहे. जेवढी रेटिंग असेल त्यानुसार 20 टक्के रक्कमेवर कमिशन देण्यात येईल.

पेट्रोलियम मंत्रालयाची प्रस्ताववर सहमती
ऑइल मार्केटिंग कंपन्यांना वाटते की ग्राहक मार्केटिंग कंपन्यासाठी आहे. जेव्हा कमिशनचे स्ट्रक्चर तयार होत आहे त्यात सेवाच्या गुणवत्तेला महत्व देण्यात येईल. ग्राहकांनी देखील आधिकर मिळावा कि त्यांनी कमिशन निश्चित करावे. सांगण्यात येत आहे की प्रस्तावाला पेट्रोलियम मंत्रालयाने सहमती दिली आहे आणि याला लवकरच लागू करण्यात येईल.

Visit : Policenama.com