LPG बुकिंगच्या नियमात मोठा बदल होणार; कोणत्याही एजन्सीकडून आता घेता येऊ शकता सिलिंडर, , जाणून घ्या कसं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज बहुतांश घरात एलपीजी गॅस सिलेंडरचा (gas cylinder) वापर केला जात आहे. तुमच्या घरीसुद्धा गॅस सिलेंडर gas cylinder येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच कामाची आहे. आतापर्यंत ग्राहक संबंधित गॅस एजन्सीवर LPG सिलिंडर घेण्यास आणि ते पुन्हा भरून देण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, सरकार आता या नियमात मोठे बदल करण्ययाच्या तयारीत आहे. सरकार आणि तेल कंपन्या एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात कोणत्याही एजन्सीकडून LPG सिलिंडर घेऊ शकणार आहे किंवा त्या एजन्सीकडून ते सिलिंडर पुन्हा भरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही योजना अंमलात आणण्यासाठी इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या तीन कंपन्या मिळून खास प्लॅटफॉर्म बनवणार आहेत.

बाळासाठी प्लास्टिक नव्हे तर काचेच्या बाटलीतून दूध देणं फायदेशीर, जाणून घ्या

सध्या ग्राहकांकडे जर इंडेनचा गॅस सिलेंडर gas cylinder असेल तर तो इंडेन गॅस एजन्सीच्या माध्यमातून रिफिल केला जाऊ शकतो. आता सरकार आणि कंपन्या असा विचार करत आहेत की LPG गॅसचं बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया कशाप्रकारे वेगवान केली जाईल. यापूर्वी सरकारने बुकिंगच्या प्रक्रियेत काहीसा बदल केला होता. त्यावेळी सरकारने नियम बदलत बुकिंग ओटीपी बेस्ड बनवण्यात आले होते. मिडिया अहवालानुसार, सरकार आणि तेल कंपन्या या गोष्टीवर विचार करत आहे की, घरगुती गॅसच्या ग्राहकांना सिलेंडर बुक करण्यासाठी त्यांच्याच कंपनीवर निर्भर राहावे लागू नये. म्हणजे जर एखाद्याकडे एचपी गॅस सिलेंडर आहे तर तो रिफिल करण्यासाठी त्याला एचपीवरच अवलंबून राहावे लागू नये. ते गॅस अन्य कंपन्यांकडूनही रिफिल करू शकतात, अशी सुविधा आणण्याच्या विचारात सरकार आहे. याबाबत सरकारने तेल कंपन्यांना निर्देश जारी केले आहेत.

READ ALSO THIS

Good News : कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

मूत्रपिंडाचे कार्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, जाणून घ्या

White Fungal Infection : भारतात ’व्हाईट फंगस’ संसर्ग देत आहे नवीन आरोग्य चिंतांना जन्म

गृह मंत्रालयानं कोरोनाच्या सध्याच्या गाइडलाइन्सला 30 जुनपर्यंत वाढवलं, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले ‘हे’ निर्देश