LPG Gas Cylinder Cashback Offer : गॅस सिलेंडर मिळणार 50 रुपयांनी ‘स्वस्त’, ‘असं’ करा ऑनलाईन बुकिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक लोक असे आहेत ज्यांची नोकरी गेली, तर अनेकांचे पगार कापण्यात आले. अशा परिस्थितीत अनेकांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा अडचणीच्या वेळी छोटी छोटी बचत देखील खूप महत्त्वाची असते. तुम्ही याची सुरुवात तुमच्या घरात वापरत असणाऱ्या सिलेंडर पासून करू शकता. आता सिलेंडरच्या बुकिंगसाठी लांब रांगा लावण्याचे दिवस राहिले नाहीत. तुम्ही घरी बसून एका मिस कॉलवर तुमचं बुकिंग करू शकता.

मागील काही महिन्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती, ज्याचा परिणाम तुमच्या बजेटवर झाला होता. आता विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सिलेंडर बुक करता येतो. जर, तुम्हाला तुमचा सिलेंडर स्वस्तात मिळावा असं वाटत असेल तर, तुम्ही खालील पद्धतीचा वापर करू शकता.

असं बुक करा सिलेंडर आणि मिळवा 50 रुपयांचा कॅशबॅक

जर तुम्ही अमेझॉनच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक केला तर तुम्हाला 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अमेझॉनवर इंडेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस तुम्ही बुक करू शकता. अमेझॉन अँपच्या पेमेंट ऑप्शन मध्ये जाऊन गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर वर क्लीक करा आणि तिथं तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका, आणि अमेझॉन मधून पेमेंट करा, तुम्हाला 50 रुपये कॅशबॅक मिळेल.

कधीपर्यंत आहे ऑफर

ही ऑफर फक्त 31 ऑगस्ट पर्यंतच उपलब्ध आहे. गॅस सिलेंडरची बुकिंग झाल्यानंतर तो तुमच्या घरी डिलिव्हर केला जाईल. तुम्ही उमंग अँप मधून देखील गॅस सिलेंडर बुक करू शकता. सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हा अँप डाऊनलोड करा. अँप ओपन करून सिलेंडर बुक करा.