LPG Cylinder : Paytm वरून बुकिंग केल्यानं गॅस सिलेंडर मिळू शकेल ‘फ्री’, ‘या’ पध्दतीनं घ्या ऑफर्सचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी सिलिंडर बुकिंग (LPG Cylinder Booking) साठी मोठ्या संख्येने पेटीएम (Paytm) चा अवलंब केला जात आहे. एलपीजी सिलिंडर बुकिंग करण्यासाठी पेटीएम आता देशातील सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे. पेटीएम आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर घेऊन येत असतो. पेटीएमने पुन्हा एकदा एलपीजी ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. आपण पेटीएमची ही ऑफर वापरल्यास आपण कमीतकमी एक गॅस सिलिंडर वाचवू शकता. म्हणजेच, तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडर विनामूल्य मिळू शकेल.

अशा प्रकारे घ्या ऑफर्सचा फायदा
या ऑफरचा फायदा पेटीएमकडून प्रथमच गॅस सिलिंडर बुक करणार्‍या लोकांनाच देण्यात येईल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये पेटीएम डाऊनलोड करावे लागेल. जर तुम्ही पेटीएम वरून तुमचे एलपीजी गॅस सिलिंडर बुक केले तर तुम्हाला प्रचंड कॅशबॅक मिळू शकेल. आपल्याला पेटीएमवरून आपले गॅस सिलिंडर बुक करावे लागेल. यानंतर तुम्हाला 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.

पेटीएम कडून 700 रुपयांच्या कॅशबॅकसाठी या स्टेप्स फॉलो करा
– आपल्याकडे आपल्या फोनमध्ये पेटीएम अ‍ॅप नसेल तर प्रथम ते डाऊनलोड करा.
– आता आपल्या फोनवर पेटीएम अ‍ॅप उघडा.
– त्यानंतर, ‘recharge and pay bills’ वर जा.
– आता ‘book a cylinder’ पर्याय उघडा.
– भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून आपला गॅस प्रोव्हायडर निवडा.
– नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा आपला एलपीजी आयडी (LPG ID) प्रविष्ट करा.
– यानंतर आपल्याला पेमेंटचा पर्याय दिसेल.
– आता पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड टाका.

आपली बुकिंगची रक्कम 500 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तरच पेटीएमची ही ऑफर काम करेल. ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे. आपण पेमेंट केल्यावर आपल्याला एक स्क्रॅच कूपन मिळेल. बुकिंगच्या 24 तासात आपल्याला हे कूपन मिळेल. हे कूपन 7 दिवसांच्या आत उघडावे. यानंतर तुमच्या खात्यात कॅशबॅक येईल.

31 जानेवारी 2021 पर्यंत वैध आहे ऑफर
पाचशे रुपयांपर्यंतच्या या कॅशबॅकचा लाभ पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणार्‍या ग्राहकांना घेता येणार आहे. ग्राहक पेटीएम एलपीजी सिलिंडर बुकिंग कॅशबॅक ऑफर (Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer) फक्त 31 जानेवारी 2021 पर्यंत घेऊ शकतात.