WhatsApp वरून करा सिलिंडर बुकिंग, जाणून घ्या नंबर आणि सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गॅस एजन्सीने आता घरगुती सिलेंडर बुकिंग (LPG Gas Cylinder) करण्यासाठी सोपी पद्धत आणली आहे. यावरून आता ग्राहकाला काही अडचणी येणार नाही, याचाच फायदा ग्राहकाला होणार आहे आणि वेळ हि वाचणार आहे. पूर्वी सिलेंडर बुक करण्यासाठी कॉल करावा लागत होता आता कॉलशिवाय व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे हे काम जलद होणार आहे. तर बुक करण्यासाठी फक्त ग्राहकाला एका नंबरवर मेसेज करावं लागणार आहे.

ग्राहकांना सुविधा देण्यासाठी आता व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे गॅस बुकिंग ची सुविधा देत आहे. व्हॉट्सॲपवरून बुकिंग करण्यासाठी ग्राहकाला कोणत्या क्रमांकावर मेसेज करावा लागणार आहे. आणि बुकिंगची प्रक्रिया काय आहे. तर ग्राहकाला कोणत्या नंबरवर Bharat Gas Booking साठी मेसेज करावा लागणार आहे. याबाबत प्रक्रिया जाणून घ्या.

काय आहे प्रक्रिया –
– गॅस बुकिंग करण्यापूर्वी सर्वात अगोदर ग्राहकाला त्याच्या मोबाइलमध्ये 1800224344 या क्रमांकावर सेव्ह करणे.
– यानंतर ग्राहकाला मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप सुरु करावा लागेल. सेव्ह केलेल्या क्रमांकाबरोबर चॅट ओपन करा.
– नंतर चॅट बॉक्स उघडल्यानंतर Hi असे लिहून पाठवावे लागेल.
– Hi लिहून पाठवल्यानंतर ग्राहकांसमोर मेसेज येईल. नंतर सुविधेनुसार भाषेची निवड करणे. प्रत्येक भाषेचा एक क्रमांक लिहिलेला आहे. तर इंग्रजी भाषेत माहिती हवी असेल तर १ नंबर लिहून सेंड करायचा आहे.
– जेव्हा ग्राहकाने क्रमांक लिहून पाठवेल. तेव्हा पुन्हा एकदा एक मेसेज येईल. यामध्ये अनेक ऑप्शन दिसणार आहे.
– तेव्हा नंतर गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी १ सेंड करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त अनेक सुविधा देखील ही आहेत.

या दरम्यान, गॅस एजन्सीमध्ये देण्यात आलेल्या रजिस्टर क्रमांकावरून गॅस सिलिंडर बुकिंग करावी लागणार आहे. २ क्रमांक पेजवर ग्राहकाला Pay For Booked Cylinder चा पर्याय मिळणार आहे.