LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Gas Cylinder Charges | आपल्याकडे आता सर्व गॅस कंपन्यांद्वारे गॅसची टाकी घरपोच दिली जाते. यामुळे आपला बराच वेळ वाचतो. लाइनीत उभे राहायची झंजट ही संपली आहे. पण तुमचा गॅस डिलिव्हरी करणारा तुमच्याकडे होम डिलिव्हरीचे अतिरिक्त पैसे घेतो का? घेतच असेल त्याशिवाय तो तुम्हाला गॅस देणार नाही. पण तुम्हाला गॅस डिलिव्हरीवाल्याशी भांडत बसायची गरज नाही. (LPG Gas Cylinder Charges)

कारण म्हणजे भारत गॅस, इंडेन गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) या कंपन्यांद्वारे त्या-त्या कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू केलेले आहेत. गॅस टाकी घरी आणून दिल्याबद्दल जर तुमच्याकडे डिलिव्हरी बॉय पैसे मागत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार या क्रमांकावर करू शकता. हे सिलिंडर घरोघरी पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पगार असतो. त्यामुळे तुम्हाला डिलिव्हरी बॉयला अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. पण, या प्रकारची मागणी कोणी केल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते (LPG Gas Cylinder Charges). ते क्रमांक खालीलप्रमाणे :

भारत गॅस – 1800224344
इंडेन गॅस – 18002333555
हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) – 18002333555

या टोल फ्री क्रमांकांवर फोन करून आपण आपला ग्राहक क्रमांक, पत्ता आणि अतिरिक्त पैशांची मागणी केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव सांगायचे आहे. त्यानंतर गॅस कंपनी या प्रकरणाची चौकशी करून गॅस ग्राहकांना अतिरिक्त पैसे माघारी मिळतील, याची काळजी घेते. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करते.

सर्वसामान्य नागरिकांचं बजेट वाढत्या महागाईमुळे कोलमडत आहे.
रोज वाढणारे भाव पाहून जमेल तितकी बचत करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात.
पण, गॅस सिलिंडरसारख्या जीवनावश्यक वस्तूची ते कितीही महाग झाली तरी खरेदी करावी लागते.
सर्वसामान्यांच्या याच गरजेचा फायदा सिलिंडर डिलिव्हरी करणारे काही जण घेत असतात.
हे सिलिंडर डिलिव्हरी मॅन ग्राहकांकडून 25 -30 रुपये अतिरिक्त आकारतात, असा अनेकांचा अनुभव आहे.
या प्रकारे अतिरिक्त पैशांची मागणी करणे हे बेकायदेशीर आहे. या वसुलीला तुम्ही चाप लावू शकता.

Web Title :- LPG Gas Cylinder Charges, | lpg cylinder charges no need to pay delivery fees know more about the rule and toll free number

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

Pune Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक