×
Homeताज्या बातम्याLPG Gas Cylinder | आज जाहीर झाले ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस...

LPG Gas Cylinder | आज जाहीर झाले ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवीन दर; दरात 15 रुपयांची वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Gas Cylinder | घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) पुन्हा एकदा महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजे 6 ऑक्टोबरला LPG Gas Cylinder च्या किमतीत वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी प्रति सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी विना अनुदानित 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर आता दिल्लीत स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरचा दर 884.50 रुपयांवरून वाढून 899.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे.

जर तुम्हाला सिलेंडरचे अधिकृत दर पहायचे असतील तर इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. याशिवाय https://www.iocl.com/pages/indane-cooking-gas-overview या लिंकद्वारे थेट सिलेंडरचे दर तपासू शकता. या लिंकवर गेल्यानंतर विना अनुदानित आणि 19 किलोच्या सिलेंडरचे दोन ब्लॉक दिसतील. जर तुम्हाला घरगुती सिलेंडरचे दर पहायचे असतील तर प्रथम येथील सेक्शनमध्ये खाली दर पाहण्यासाठी एक लिंक दिली आहे, तिच्यावर क्लिक करा.

यानंतर यामध्ये राज्य, जिल्हा आणि डिस्ट्रीब्यूटरची निवड करावी लागेल.
ही माहिती दिल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यावर सर्व दर मिळतील.
यामध्ये 5 किलो, 14 किलोपर्यंतच्या सिलेंडरचे दर समजतील.
यातून तुमच्या शहराची निवड करून सहजपणे सिलेंडरचा दर पाहू शकता.

Web Title :- LPG Gas Cylinder | Lpg cylinder price in india october 2021 rates know how to check lpg cylinder rates in your city check here all details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fingernails | नखांचा रंग पाहून ओळखा आरोग्याची स्थिती, ‘हे’ 8 आजार जाळ्यात ओढू शकतात; जाणून घ्या कसे ओळखावे

Kirit Somaiya | किरीट सोमय्या बारामती दौऱ्यात कोणता गौप्यस्फोट करणार?, चर्चांना उधाण

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,840 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Must Read
Related News