LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इंधन दरवाढीबरोबरच गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा महागाईच्या काळात Paytm ने एलपीजी सिलेंडर बुक (LPG Gas Cylinder) करणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत घरगुती गॅस सिलिंडर Paytm App वरुन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 900 रुपयापर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर केवळ Paytm App वरुन पहिल्यांदा गॅस बुकिंग करणाऱ्यांसाठीच राहणार आहे. LPG Gas Cylinder | paytm offer upto 900 cashback on booking of lpg gas cylinder

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 कंपन्यांच्या सिलेंडरवर या ऑफरचा फायदा घेता येईल. तसेच Paytm वर युजर आपल्या गॅस सिलेंडर डिलीवरीला ट्रॅकही करू शकतील. याशिवाय युजर्संना IVR, मिस्ड कॉल आणि WhatsApp द्वारेही बुक केलेल्या एलपीजी सिलेंडरचे पेमेंट Paytm द्वारे करता येणार आहे.

असा घ्या ऑफरचा फायदा

1) सर्वात आधी मोबाईलवर Paytm App डाउनलोड करावा लागेल

2) Paytm App च्या होम पेजवर show more ऑप्शनवर टॅप करा.

3) त्यानंतर Recharge and Pay Bills सिलेक्ट करा.

4) Book a Cylinder वर क्लिक करा.

5) तुमच्या गॅस प्रोव्हाईडरची निवड करा, इथे 3 पर्याय भारत गॅस, इंडेन गॅस, अन् एचपी गॅस पर्याय दिसतील.

6) गॅस प्रोव्हाईडर निवडल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक संख्या टाका.

7) त्यानंतर Proceed वर क्लिक करुन पेमेंट करा.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे

मोदी सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा ! फॉर्म-16 जारी करण्यासह अनेक योजनांची अंतिम तारीख वाढवली, जाणून घ्या नवीन डेडलाईन्स