LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Gas Cylinder Price Hike | तेल कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price Hike) किंमतीत पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात १४.५ किलो गॅस सिलेंडरचा भाव १००२.५० रुपये झाला आहे.

 

तेल कंपन्या यापूर्वी दर महिन्यांच्या १ तारखेला गॅस सिलेंडरचे दर निश्चित करीत असत. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्यात कधीही वाढ केली जात आहे.

१ मे रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (LPG Commercial Gas Cylinder) दरात १०२.५० रुपयांनी वाढ केली होती. त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली नव्हती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर आता लागोपाठ दुसऱ्या महिन्यात दर वाढ करण्यात आली आहे.

 

त्याच्या अगोदर ऑक्टोबर २०२१ मध्ये २५ रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती.
त्यानंतर पाच राज्यातील निवडणुकांमुळे पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel)
बरोबरच गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात वाढ करण्यात आली नव्हती.

 

Web Title :- LPG Gas Cylinder Price Hike | lpg price hike 142 kg domestic lpg cylinder increased by rs 50 with effect from today in mumbai pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा