LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर जारी, जाणून घ्या काय आहेत नोव्हेंबरचे नवे दर

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमध्ये स्वयंपाकांच्या गॅसच्या बाबतीत नोव्हेंबर महिन्यात दिलासादायक बातमी मिळाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यासाठी एलपीजी स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरच्या दराम कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अक्टोबर महिन्यात सुद्धा स्वयंपकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. एकीकडे बाजारात बटाट, कांद्यापासून डाळींच्या दरात वाढ झालेली असताना सर्वसामान्यांना ही दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. मात्र, 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 78 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

यापूर्वी शेवटच्या वेळी 14 किलोग्रॅमच्या स्वयंपकांच्या गॅस सिलेंडरच्या दरात जुलै 2020 ला 4 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर, यापूर्वी जूनच्या दरम्यान दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा विना अनुदानित एलपीजी सिलेंडर 11.50 रुपयांनी महागला होता, तर मेमध्ये 162.50 रुपयांपर्यंत स्वस्त झाला होता.

चेक करा नवे दर
देशाची सर्वात मोठी ऑईल मार्केटींग कंपनी आयओसीच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सिलेंडच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. मागच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये जे दर होते, तेच नोव्हेंबर महिन्यासाठी राहतील.

दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या विना अनुदानित स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थिर आहे. अशाच प्रकार मुंबईत विना अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. मात्र, चेन्नईत किंमती सुद्धा 610 रुपये प्रति सिलेंडरवर कायम आहे. तर, कोलकातामध्ये 14 किलोग्रॅमच्या एका सिलेंडरसाठी 620 रुपये द्यावे लागतील.

कॉमर्शियल सिलेंडरचे दर वाढले
नोव्हेंबर महिन्यासाठी 19 किलोग्रॅमच्या कॉमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये सर्वात जास्त 78 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. आता येथे एक कॉमर्शियल सिलेंडरसाठी 1,354 रुपये द्यावे लागतील. कोलकाता आणि मुंबईत 76 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. यानंतर या दोन्ही शहरांमध्ये नवे दर अनुक्रमे 1,296 आणि 1,189 रुपये आहेत. राजधानी दिल्लीबाबत बोलायचे तर आता येथे एका कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1,241 रुपये द्यावे लागतील.

बदलली एलपीजी सिलेंडर डिलिव्हरीची पद्धत
आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरची होम डिलिव्हरीची पद्धत सुद्धा बदलत आहे. आता ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी वन-टाइम पासवर्डची गरज असेल. तेल कंपन्या ही नवी सिस्टम लागू करणार आहेत, जेणेकरून गॅस सिलेंडर चोरीची प्रकरणे टाळता येतील आणि योग्य ग्राहकापर्यंत डिलिव्हरी होईल. या नव्या सिस्टमला डिलिव्हरी ऑथेन्टिकेशन कोडच्या नावाने ओळखले जाईल. या अंतर्गत, गॅस सिलेंडरची डिलिव्हरी तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत ग्राहकाकडून डिलिव्हरी करणार्‍यास एक कोड दाखवला जाणार नाही. सुरूवातीच्या काळात ही सिस्टम 100 मोठ्या शहरांत लागू केली जाईल.