सर्वसामान्यांना मोठा झटका ! आज पुन्हा वाढले गॅस सिलेंडरचे दर, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला; जाणून घ्या नवीन रेट

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्य माणसाला आणखी एक मोठा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. ज्यानंतर विना अनुदानित 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 769 रुपयांनी वाढून 794 रुपये झाली आहे. वाढलेले दर आज 25 फेब्रुवारी 2021 पासून लागू झाले आहेत. या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये केलेली ही तिसरी वाढ आहे. विना अनुदानित सिलेंडरच्या दरामध्ये आज 25 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत तिसर्‍यांदा महागला सिलेंडर
फेब्रुवारी महिन्यात तीनवेळा गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. सरकारने 4 फेब्रुवारीला एलपीजीच्या दरात 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले होते. आता ही तिसरी वेळ आहे जेव्हा पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तीन महिन्यांत 200 रुपयांपर्यंत महागला
1 डिसेंबरला गॅस सिलेंडर 594 रुपयांनी वाढून 644 रुपये झाला होता. 1 जानेवारीला पुन्हा 50 रुपये वाढवण्यात आले, ज्यानंतर 644 रुपयांचा सिलेंडर 694 रुपये झाला. 4 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या वाढीनंतर याची किंमत 644 रुपयांवरून वाढून 719 रुपये झाली. 15 फेब्रुवारीला 719 रुपयांवरून 769 रुपये झाला आणि आज 25 फेब्रुवारीला 25 रुपयांनी दर वाढवल्याने याची किंमत 769 रुपयांवरून 794 रुपयांवर आली आहे.

कॉमर्शियल गॅसचा भाव
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या दरात बदल होतात. यावेळी एक फेब्रुवारीला केवळ कामर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ झाली होती. यानंतर देशाच्या राजधानीत 19 किलोच्या सिलेंडरचा भाव 1533.00 रुपये, कोलकातामध्ये 1598.50 रुपये, मुंबईत 1482.50 रुपये आणि चेन्नईत 1649.00 रुपये झाला आहे.