LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : LPG Gas Cylinder Price | नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एक ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये (LPG Gas Cylinder Price) वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किग्रॅ कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 73.5 रुपये प्रति सिलेंडरची वाढ केली आहे. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 कि.ग्रॅ. कमर्शियल गॅस सिलेंडरचा दर 1,500 रुपयांवरून वाढून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे.

तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या 14.2 कि.ग्रॅ. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केलेली नाही. दिल्लीत 14.2 कि.ग्रॅ. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 834.50 रुपये कायम आहे. मागील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपकाच्या गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढवले होते.

14.2 किग्रॅ सिलेंडरचे दर

दिल्लीत घरगुती वापराच्या 14.2 कि.ग्रॅ. सिलेंडरच्या दरात बदल झालेला नसून तो 834.50 रुपये, कोलकातामध्ये 861 रुपये, मुंबईत 834.50 रुपये आणि चेन्नईत 850.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.

19 कि.ग्रॅ. कमर्शियल गॅस सिलेंडरचे नवीन दर

सरकारी तेल कंपन्यांनी 19 किग्रॅ कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात आज वाढ केली. सर्वात जास्त
वाढ चेन्नईत 73.50 रुपये प्रति सिलेंडर केली आहे. दिल्लीत 73 रुपये वाढल्याने 1623,
कोलकातामध्ये 72.50 रुपये वाढल्याने 1629 रुपये आणि मुंबईत 72.50 रुपये वाढल्याने
कमर्शियल सिलेंडरची किंमत 1579.50 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा

Zika Virus in Maharashtra | राज्यात आढळला ‘झिका’चा पहिला रुग्ण, पुण्याच्या पुरंदरमध्ये खळबळ

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 7,467 ‘कोरोना’मुक्त, 6,959 नवीन रुग्ण

Pune Crime | कोथरुडमध्ये कारमधून आलेल्या चोरट्यांचा ‘रोड शो’, पार्किग केलेल्या गाड्यांमधून कार टेप व साऊंड सिस्टीमची चोरी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LPG Gas Cylinder Price | lpg gas cylinder price in august 2021 hiked by rs 73 per cylinder check latest lpg cylinder rate 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update