गॅस सिलेंडरचा ‘स्फोट’ झाल्यास कंपनीकडून ५० लाखांची मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गॅस सिलिंडरचा वापर जपून करा असे सांगितले जाते, मात्र तरीही अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरच्या स्फोटांने अनेकांचे मृत्यू होणाचे प्रमाण आधिक आहे. त्यात सर्वात आधिक समावेश आहे तो महिलांचा. याचमुळे कंपन्याना ग्राहक न्यायालयाने कंपन्यांना १० लाख ४६ हजार रुपये मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही प्रकरणात गंभीर जखमी महिलांना १ लाख ७५ हजार रुपये मदत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

देशात गॅसचा वापर देशातील अधिकांश लोक करतात. त्यामुळे आपल्याला गॅस वापरताना काय सावधगिरी बळगावी आणि दुर्घटना झाल्यावर काय करायला हवे हे आपल्याला माहित आहे. तसेच आपल्या हे देखील महित हवे की, LPG गॅस सिलेंडर फूटल्यास किंवा लिक झाल्यास अशा वेळी ग्राहकांना काय आधिकार असतात हे माहित पाहिजे.

प्रत्येक LPG वर मिळतो ५० लाखाचा विमा

१. MYLPG.IN नुसार, जर कोणीही LPG कनेक्शन घेतले आणि त्याच सिलेंडरने घरात कोणतीही दुर्घटना घडली तर त्या व्यक्तीला ५० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा हक्क आहे.

२. एक दुर्घटनेवर आधिकतर ५० लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकेल. दुर्घटनेने त्रस्त व्यक्तीला आधिकाकाधिक १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येते

३. एलपीजी सिलेंडरवर विमा सुरक्षा मिळवण्यासाठी ग्राहकाला दुर्घटना झाल्यावर लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनला आणि आपल्या एलपीजी वितरकाला देण्यात यावी.

४. ऑईल वितरण कंपन्या इंडियन ऑईल. एचपी किंवा भारत पेट्रोलियमच्या वितरकांना व्यक्तींना आणि संपत्तीसाठी थर्ड पार्टी विमा सुरक्षेसह दुर्घटनासाठी विमा पॉलिसी घेणे आवश्यक असते.

५. ही कोणत्याही व्यक्ती अथवा ग्राहकाच्या नावे नसते तर प्रत्येक ग्राहक या पॉलिसी अंतर्गत सुरक्षित असतो, यासाठी कोणत्याही प्रकराचे वेगळे प्रिमियम देण्याची आवश्यकता नसते.

६. FIR ची प्रत, जखमीच्या उपचाराच्या दवाखान्याच्या पावत्या, मेडिकल बिल किंवा मृत्यू झाल्यास पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र संभाळून ठेवा.

७. दुर्घटना झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त व्यक्तीकडून वितरकच्या माध्यमातून मदतचीचा दावा करण्यात येतो, दावा केल्यानंतर विमा कंपन्या भरपाई वितरककडे देते. आणि ही रक्कम अखेर ग्राहकापर्यंत पोहचवण्यात येते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक