LPG Gas Cylinder Subsidy | LPG गॅस सिलिंडरवर ‘सबसिडी’ मिळवणाऱ्यांना दणका ! ‘या’ लोकांनाच मिळणार अनुदान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Gas Cylinder Subsidy | घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic Gas Cylinder) सबसिडीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Yojana) मोफत एलपीजी कनेक्शन मिळवणाऱ्या 9 कोटी लाभार्थ्यांना केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) एलपीजी सबसिडी (LPG Gas Cylinder Subsidy) देत आहे आणि इतर लाभार्थ्यांना बाजारभावाने एलपीजी सिलिंडर घ्यावे लागतील. पेट्रोलियम सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे की, जून 2020 पासून एलपीजीवर कोणतेही अनुदान दिले जात नाही. पण उज्ज्वला योजनेंतर्गत ज्यांना गॅस सिलिंडर दिलंय त्यानांच 200 रुपये अनुदान दिलं जातंय असं ते म्हणाले.

 

हे अनुदान सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी दिलं जातंय. सौदी सीपीमध्ये मागील 6 महिन्यांत एलपीजी गॅसच्या दरात 43 टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवण्यात आलीय. असं असतानाही भारत सरकार आपल्या देशवासियांना आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दुष्परिणाम पासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यात फक्त 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात 6 महिन्यांत एलपीजीचे दर 43 टक्क्यांनी वाढले आहेत, तर दुसरीकडे याच 6 महिन्यांत एलपीजी फक्त 7 टक्क्यांनी महागला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिली.

नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी उज्ज्वला योजनेच्या
लाभार्थ्यांना वर्षभरात प्रति सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी दिली जातेय असं म्हटलं होतं.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट 200 रुपये सबसिडी मिळेल
आणि त्यांच्यासाठी प्रभावी दर 803 रुपये प्रति 14.2 किलो सिलेंडर असेल. बाकी दिल्लीमध्ये त्याचा दर 1,003 रुपये असणार आहे.

 

Web Title :- LPG Gas Cylinder Subsidy | lpg gas cylinder subsidy ujjwala yojana central government news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा