LPG गॅस कनेक्शन घेणं झालं एकदम सोपं, Indian oil नं संपुष्टात आणले ‘हे’ नियम; ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडर घेत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता तुम्ही अ‍ॅड्रेस प्रूफ न देता सुद्धा सिलेंडर घेऊ शकता. अगोदर नियम होता की, ज्या लोकांकडे कोणताही अ‍ॅड्रेस प्रूफ नसेल त्यांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देऊ नये. परंतु देशाची सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसीएल) ने सामान्य लोकांना दिलासा देत स्वयंपाकाच्या गॅससाठी अ‍ॅड्रेस प्रूफची अट बंद केली आहे. आता अ‍ॅड्रेस प्रूफ नसेल तरी सुद्धा गॅस सिलेंडर खरेदी करता येईल.

जाणून घ्या अर्जाची पूर्ण प्रक्रिया
* प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शनवरून फॉर्म डाऊनलोड करा.
* आपला केवायसी फॉर्म जवळच्या एलपीजी केंद्रावर जमा करा.
* जनधन बँक, घरातील सर्व सदस्यांचे अकाऊंट नंबर इत्यादी माहिती अपडेट करा.
* 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरसाठी तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल.

असा बुक करा एलपीजी सिलेंडर
इंडेनचा एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी देशात कुठूनही 8454955555 नंबर वर मिस्ड कॉल करू शकता. याशिवाय तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा बुक करू शकता. बुक करण्यासाठी 7588888824 नंबरवर ’REFILL’ टाईप करून पाठवा.