LPG Gas Leak at Kasturba Hospital | कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती, 58 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  LPG Gas Leak at Kasturba Hospital | दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती झाल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने रुग्णालयातील 58 रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या 58 जणांपैकी 20 जण कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिंचपोकळी परिसरातील आर्थर रोडजवळ कस्तुरबा रुग्णालय (LPG Gas Leak at Kasturba Hospital) आहे. इथे एलपीजी गॅस पाईप लाईन लीक झाली.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान गॅस गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली आहे, तिथे अधिक रुग्ण नव्हते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनाही अन्य ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णालयात एलपीजी गॅसची गळतीझाल्याचे समजल्यावर इमारतीतील सर्व कर्मचारी व रुग्णांना बाहेर काढण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून त्यांनी सर्वांना इमारतीतून बाहेर काढले आहे. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाचे कर्मचारी गॅस गळती बंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन या गॅस गळतीची माहिती घेतली.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

HDFC Bank Alert | अलर्ट ! एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना; आजपासून रविवार रात्रीपर्यंत बँकेच्या ‘या’ सेवा बंद राहणार

High Court | वडिलांचेच नव्हे, आईचेही आडनाव वापरू शकतात मुले : दिल्ली उच्च न्यायालय

Tokyo Olympics 2020 | भारत आणि पाकिस्तानमध्ये सुवर्ण पदकासाठी होणार आज ‘झुंज’