LPG Gas latest price : पुन्हा महागला स्वयंपाकाचा गॅस, 25 रुपये वाढली किंमत; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : मार्चच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. आज किमतीमध्ये 25 रुपयांची वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी उसळल्या होत्या. यापूर्वी 25 फेब्रुवारीला किंमतीतमध्ये वाढ झाली होती. अगोदर, 4 फेब्रुवारीला 25 रुपये, 14 फेब्रुवारीला 50 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 फेब्रुवारीला यामध्ये 25 रुपयांची वाढ झाली होती. फेब्रुवारी महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर 100 रुपये वाढले.

पुन्हा एकदा 14.2 किलोग्रॅचा विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे. किंमतीत आलेल्या तेजीनंतर दिल्लीत आता घरगुती गॅसचा रेट 794 वरून वाढून 819 रुपये झाला आहे. मुंबईत नवी किंमत 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये आणि चेन्नईत 835 रुपये झाली आहे. जानेवारी महिन्यात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. मात्र, त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात दोनवेळा 50-50 रुपये वाढवले होते. फेब्रुवारी महिन्यात तीन वेगवेगळ्या वेळी किंमतीत वाढ झाली. एकुण वाढ 100 रुपयांची होती.