LPG Gas Price | दिलासादायक! LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय?, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सणासुदीच्या काळात महागाईने त्रस्त असलेल्या जनतेची सप्टेंबर महिन्याची सुरवात दिलासादायक झाली आहे. आजपासून एलपीजी गॅसच्या दरात (LPG Gas Price) घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Price) दरात 100 रुपयांनी घट झाली आहे. परंतु ही कपात फक्त व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरसाठी (Commercial Gas Cylinder) आहे. तर घरगुती वापरासाठी (Domestic Gas Cylinder) असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

 

1 सप्टेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर जवळपास 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 1 इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 91.50 रुपयांनी घट झाली आहे. दिल्लीत आजपासून 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Price) आता 1976.50 हून 1885 रुपये होणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर 1995.50 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. यापूर्वी हा दर 2095 रुपये इतका होता. मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1844 रुपये इतकी आहे.

 

दर कपात किती झाली?
व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात दिल्लीत 91.50 रुपये, कोलकातामध्ये 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये आणि चेन्नईत 96 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या दर कपातीचा फायदा रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी एलपीजी गॅस वापरणाऱ्यांना होणार आहे.

घरगुती गॅस दरात बदल नाही
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात 6 जुलैपासून कोणताही बदल झाला नाही. जुलै महिन्यात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागत आहेत.

 

हॉटेलचं जेवण स्वस्त होणार?
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनी (Hoteliers) अन्नपदार्थांचे दर वाढवले होते.
मात्र, सगल दुसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
त्यामुळे हॉटेलमधील जेवणाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- LPG Gas Price | lpg-cylinder-prices-1-september-commercial-gas-reduced-from today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rain | पुण्यात पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; गॅस वाहिनी तुटली, 7 ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटना

 

Chadani Chowk | दिल्लीजवळील ट्विन टॉवर जमीनदोस्त करणारी कंपनी पुण्यातील पूल पाडणार

 

Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil | ‘सोंगाड्या, जॉनी लिव्हर आणि गुरु’, शहाजीबापू आणि मिटकरींमध्ये वार-पलटवार