LPG Gas Price | वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका ! एलपीजी गॅस सिलेंडर 25 रूपयांनी महागला

नवी दिल्ली : LPG Gas Price | नूतन वर्षाच्या सुरूवातीलाच महागाईचा फटला बसला आहे. इंधन कंपन्यांनी दि. 1 डिसेंबर रोजी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले असून प्रति सिलेंडरमागे 25 रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. करण्यात आलेली दरवाढ ही व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Gas Price)

 

 

दि. 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्यामुळे सध्यातरी घरातील किचनचे बजेट बिघडणार नाही असे म्हणता येईल. व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाल्याने मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.

घरगुती वापरासाठीचा गॅस सिलेंडर हा 14.2 किलोंचा असतो तर व्यावसायिक वापरासाठी असलेला एलपीजी गॅस सिलेंडर हा 19 किलोचा असतो. (LPG Gas Price Marathi News)

 

देशातील 4 प्रमुख मेट्रो शहरातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर पुढील प्रमाणे –

 

दिल्ली – 1769 रूपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1721 रूपये प्रति सिलेंडर
कोलकता – 1870 रूपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1917 रूपये प्रति सिलेंडर

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा