LPG Gas Subsidy Update | घरघुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान; ‘या’ पद्धतीने तपासा खात्यातील रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Gas Subsidy Update | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) अलीकडेच एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas) त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. नुकतंच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याबरोबरच आता सरकारकडून एलपीजीवर 200 रुपयांची सबसिडी (LPG Gas Subsidy Update) जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे.

 

एलपीजीवरील सबसिडी (LPG Gas Subsidy Update) बंद होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे एलपीजी आधार लिंक (LPG Aadhar Link) नसणे. त्याचबरोबर ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये अथवा त्याहून अधिक आहे, त्यांनाही सबसिडी दिली जात नाही. दरम्यान, तुमच्या खात्यामध्ये सबसिडी येत आहे की नाही? याबाबत तुम्हाला माहिती होणार आहे. सबसिडी (LPG Gas Subsidy) तुमच्या खात्यात येत आहे की नाही? हे तुम्हाला कसे समजेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

जाणून घ्या महत्वाची प्रक्रिया –

– सर्व प्रथम www.mylpg.in उघडा.

– आता तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.

– येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.

– यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल.

– आता वरच्या उजव्या बाजूला साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर टॅप करा.

– तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असेल, तर साइन-इन करा. जर तुमच्याकडे आयडी नसेल, तर तुम्ही New User वर टॅप करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता.

– आता तुमच्या समोर एक विंडो उघडेल, उजव्या बाजूला View Cylinder Booking History वर टॅप करा.

– तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर सबसिडी आणि केव्हा देण्यात आली याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

– यासोबतच, जर तुम्ही गॅस बुक केला असेल आणि तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही फीडबॅक बटणावर क्लिक करू शकता.

– आता तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळाल्याची तक्रार देखील दाखल करू शकता.

– याशिवाय, तुम्ही या टोल फ्री क्रमांक 18002333555 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

 

Web Title :- LPG Gas Subsidy Update | lpg gas subsidy latest news 200 subsidy available on lpg gas cylinder know how to check your balance in account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा