LPG Price Hike | दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलेंडर महागणार? पुढच्या आठवड्यात किंमती वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती (petrol-diesel prices) वाढत आहेत. त्यामुळे जनता हैराण झाली असताना आता घरगुती सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमती वाढण्याची (LPG Price Hike) शक्यता असल्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी (LPG Price Hike) वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याचा परिणाम एलपीजी इंधनाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.

 

आतापर्यंत 90 रुपयांची वाढ

 

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना (Petroleum Company) तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती लक्षात घेता एलपीजीच्या विक्रीवर 100 रुपये प्रति सिलेंडर नुकसान होत आहे.
तसेच यावर सरकारकडून देण्यात येणारे अनुदानही बंद आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमती किती प्रमाणात वाढवायच्या हे केंद्र सरकारच्या (Central Government) हातात आहे.
यापूर्वी 6 ऑक्टोबरला 15 रुपयांची वाढ केली होती.
जुलैपासून विचार करता घरगुती सिलेंडरच्या (LPG Price Hike) किमतीमध्ये 90 रुपयांची वाढ झाली आहे.

 

8 महिन्यात 200 पेक्षा अधिक वाढ

 

1 जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यात सिलेंडरच्या किमतीमध्ये 200 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
1 जानेवारी रोजी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती.
आता 884.5 आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतके झाले आहेत.
त्यानंतर सिलेंडरच्या किमती 15 फेब्रुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब्रुवारी रोजी 494, 1 मार्च रोजी 819, 1 एप्रिल रोजी 809, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या.
त्यानंतर 6 ऑक्टोबरला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ झाली होती.

 

Web Title : LPG Price Hike | lpg cylinder price may hike in next week know what is the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jalyukt Shivar Yojana | ‘जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट’, सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म, जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश