Lockdown 5.0 : सर्वसामान्यांना मोठा झटका ! 110 रुपयांनी महागला ‘विना-अनुदानित’ LPG गॅस सिलेंडर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन 5.0 मध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (एपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) विना-अनुदानित एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीच्या वाढीची घोषणा केली आहे. 14.2 किलोग्रॅमचा विना-अनुदानित एलपीजी सिलेंडर दिल्लीत 11.50 रुपायांनी महागला आहे. आता नवी किंमत वाढून 593 रुपयावर आली आहे. तर 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरचा दर 110 रुपये वाढून 1139.50 रुपये झाला आहे.

जाणून घ्या नवे दर

आयओसीच्या वेबसाइटवर दिलेल्या दरानुसार, आता दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा विना-अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत वाढून 593 रुपये झाली आहे, जी 581.50 रुपये होती.

*  तर, कोलकातामध्ये 616.00 रुपये, मुंबईत 590.50 रुपये आणि चेन्नईत 606.50 रुपयांवर गेली आहे. जी अनुक्रमे 584.50 रुपये, 579.00 रुपये आणि 569.50 रुपये होती.

19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर झाला इतका महाग

*  19 किलोग्रॅम एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, जी 1 जूनपासून लागू झाली आहे. दिल्लीत 19 किलोग्रॅमचा स्वयंपाकांचा गॅस सिलेंडर 110 रुपयांनी महाग झाला आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरची किंमत 1029.50 रुपये होती, जी 1 जूनपासून वाढून 1139.50 रुपये झाली आहे.

*  अशाच प्रकारे, कोलकातामध्ये याची किमत वाढून 1193.50 रुपये, मुंबईत 1087.50 रुपये आणि चेन्नईत 1254.00 रुपये झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like