LPG Subsidy : 300 रुपये स्वस्त मिळणार गॅस सिलेंडर, जाणून घ्या कसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या कालावधीपासून लोकांच्या खात्यात एलपीजी सबसिडी येणे बंद झाले आहे. याचे कारण सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता काही महिन्यांपासून पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर वेगाने वाढत आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये 594 रुपयांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा रेट आता 819 रुपये झाला आहे. यासाठी ज्या लोकांना सबसिडी मिळत होती, त्यांना हे पैसे मिळू शकतात. परंतु एक दुसरे कारण सुद्धा आहे, ज्यामुळे सबसिडी मिळत नसावी, ते आहे आधार लिंक नसणे. जर तुमचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला हे काम ताबडतोब करावे लागेल.

कुणाला मिळू शकत नाही सबसिडी
मात्र, असेही नाही की सर्वांनाच सबसिडी दिली जाते. एखाद्याचे वार्षिक वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर व्यक्ती गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळवण्यास पात्र नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न पती-पत्नीचे एकत्र धरले जाईल.

किती मिळेल सबसिडी
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणार्‍या सबसिडीच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. आता सबसिडी रक्कम 153.86 रुपयांवरून वाढून 291.48 रुपये झाली आहे. अशा प्रकारे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणारी सबसिडी रक्कम सुद्धा 174.86 रुपयांवरून वाढून 312.48 रुपये झाली आहे. जर तुम्हाला सबसिडी मिळाली तर सुमारे 300 रुपयांची बचत नक्की होईल.

इंडेन ग्राहकांसाठी महत्वाच्या डिटेल
जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल तर तुमचा मोबाइल नंबर गॅस एजन्सीकडे रजिस्टर्ड असल्याची खात्री करा. मोबाइलवरून मॅसेज पाठवून तुमचा नंबर रजिस्टर करू शकता. यासाठी मॅसेजमध्ये लिहा IOC नंतर स्पेस देऊन गॅस एजन्सीच्या फोन नंबरचा एसटीडी कोड आणि हा मॅसेज कस्टमर केयर नंबरवर पाठवा. ऑफिशियल वेबसाइट (https://cx.indianoil.in) वरून गॅस एजन्सीचा नंबर मिळेल. जर मोबाइल नंबर अगोदरपासूनच रजिस्टर आहे तर घरबसल्या आधार सुद्धा रजिस्टर करता येते.

कसे कराल आधार लिंक
एलपीजी कनेक्शनला आधारशी लिंक करण्यासाठी मॅसेजमध्ये युआयडी लिहा नंतर स्पेस देऊन आधार नंबर लिहा आणि गॅस एजन्सीच्या नंबरवर सेंड करा. आधार एलपीजी कनेक्शनशी लिंक झाल्यानंतर एक मॅसेज मिळेल, ज्यामध्ये यास दुजोरा मिळेल. सध्या सरकारकडून कोणत्याही ग्राहकाला सबसिडी दिली जात नाही. ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून एलपीजी सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.