LPG Subsidy | खुशखबर ! स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 237 रुपये ट्रान्सफर, ‘इथं’ तपासून पहा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Subsidy | स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत (LPG price) सातत्याने वाढ होत आहे. मागील 7 वर्षात किंमत दुप्पटीपेक्षा जास्त झाली आहे. मात्र, या दरम्यान ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. होय, स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) वर पुन्हा एकदा सबसिडी दिली जात आहे. ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. माहितीनुसार आता एलपीजी गॅस ग्राहकांना (LPG customers) 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडीच्या (LPG Subsidy) रूपात दिले जात आहेत.

 

काही ग्राहकांना 158.52 किंवा 237.78 रुपये सबसिडी (LPG Subsidy) मिळत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. कारण कोरोना काळात अवघी 10 ते 12 रूपये सबसिडी ग्राहकांच्या खात्यात येत होती. तसेच मागील काही दिवसांपासून अशी प्रकरणे येत होती की, ग्राहकांच्या खात्यात सबसिडी पाठवली जात नाही. आता दावा केला जात आहे की, अशा तक्रारी बंद झाल्या आहेत.

 

आत्ताच तपासून पहा

गॅस सबसिडीचे (LPG Subsidy) पैसे चेक करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे आणि दुसरी एलपीजी आयडीद्वारे, जो तुमच्या गॅस पासबुकमध्ये लिहिलेला असतो. याची प्रक्रिया काय आहे जाणून घेवूयात…

 

1. www.mylpg.in वेबसाइटवर जा.

2. उजवीकडे तीन गॅस कंपन्या दिसतील.

3. तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या फोटोवर क्लिक करा.

4. यानंतर ओपन झालेल्या नवीन विंडोत गॅस सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल.

5. उजवीकडे सर्वात वर असलेले साइन-इन आणि न्यू यूजर ऑपशन सिलेक्ट करा.

6. आयडी असेल तर साइन-इन करा.

7. आयडी नसेल तर न्यू यूजर सिलेक्ट करा.

8. यानंतर आलेल्या विंडोत उजवीकडे व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री पर्याय निवडा.

9. आता तुम्हाला समजेल सबसिडी (LPG Subsidy) मिळत आहे किंवा नाही.

 

Web Title :- LPG Subsidy | good news lpg subsidy is available on lpg cylinder rs 237 transferred to customers account check details marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stock | कृषी संबंधीत ‘या’ कंपनीच्या शेयरने 1 वर्षात 1 लाखाचे बनवले 3.14 कोटी रुपये

WhatsApp Privacy | व्हॉट्सअ‍ॅपनं आणले जबरदस्त फीचर ! सिलेक्टेड लोकांनाच दिसणार तुमचा प्रोफाइल फोटो; जाणून घ्या

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती
Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या