LPG Subsidy Updates : तुम्हाला मिळत नसेल गॅस सबसिडी? घरबसल्या अशी करा तक्रार, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एलपीजी म्हणजे स्वयंपाकाचा गॅस खरेदी केल्यानंतर त्याची सबसिडी तुमच्या खात्यात येत नसेल तर याबाबत कसे जाणून घ्यावे याची काही स्टेपमध्ये माहिती देत आहोत. अशा प्रकारे घरबसल्याने आपण सबसिडी मिळत नसल्याची तक्रार करू शकता. जाणून घेवूयात पद्धत…

–  ब्राऊझरमध्ये जा आणि www.mylpg.in टाईप करून ओपन करा.

–  डावीकडे गॅस कंपन्यांच्या गॅस सिलेंडरचे फोटो दिसतील, तुमच्या प्रोव्हायडरवर क्लिक करा.

–  आता गॅस सर्व्हिस प्रोव्हायडरची नवीन विंडो ओपन होईल.

–  यानंतर सर्वात वर उजवीकडील साईन-इन आणि न्यू युजरच्या ऑपशनवर टॅप करा.

–  आयडी तयार असेल तर साईन-इन करा.

–  आयडी नसेल तर न्यू यूजर वर टॅप करा. वेबसाइटवर लॉगइन करा.

–  यानंतर जी विंडो ओपन होईल, त्यामध्ये उजवीकडे व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीच्या पर्यायावर टॅप करा.

–  टॅप केल्यानंतर येथे कोणत्या सिलेंडरची किती सबसिडी दिली आहे आणि कधी याबाबत माहिती मिळेल.

–  तर, जर गॅस बुक केला आहे आणि सबसिडीचे पैसे मिळाले नसतील तर फिडबॅकच्या बटनवर क्लिक करा. येथे तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

–  जर तुम्ही एलपीजी आयडी तुमच्या बँक खात्याशी लिंक केला नसेल तर डिस्ट्रीब्यूटरकडे जाऊन ही माहिती द्या.

–  तसेच 18002333555 वर फ्री कॉल करून सुद्धा तक्रार करू शकता.

थांबू शकते सबसिडी :

जर एलपीजीवरील सबसिडी मिळत नसेल तर याचे कारण आधार लिंक नसणे हे असू शकते. ज्यांना पती-पत्नीचे मिळून वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा यापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी मिळत नाही.