LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) वर पुन्हा एकदा सरकार कडून सबसिडी दिली जात आहे. ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना (LPG customers) 79.26 रुपयांपासून 237.78 रुपये सिलेंडर सबसिडी म्हणून दिले जात आहेत. तुमच्या बँक खात्यात सबसिडी आली किंवा नाही हे तपासण्याची पद्धत जाणून घेवूयात. (LPG Subsidy)

 

घरबसल्या असे तपासा सबसिडी मिळत आहे किंवा नाही

प्रथम इंडियन ऑईलची वेबसाइट https://cx.indianoil.in/ वर व्हिजिट करा.

आता Subsidy Status आणि Proceed वर क्लिक करा.

यानंतर Subsidy Related (PAHAL) च्या ऑपशनवर क्लिक करा.

आता Subsidy Not Received वर क्लिक करा.

रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि LPG ID नोंदवा.

यानंतर तो व्हेरिफाई करा आणि सबसिमट करा.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. (LPG Subsidy)

या लोकांना मिळते LPG सबसिडी
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न पती आणि पत्नी दोघांचे मिळून धरले जाते.

 

14 किलोच्या सिलेंडरचे वजन कमी होऊ शकते.
केंद्र सरकार (Central Government) घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder) चे वजन कमी करण्याचा विचार करत आहे. गॅस सिलेंडर 14.2 किलोग्रॅम असल्याने त्याची वाहतुक करताना महिलांना त्रास होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हे वजन कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर सरकार विचार करत आहे.

 

Web Title :- LPG Subsidy | lpg subsidy is available rs 79 to 237 on lpg cylinder check your bank account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना

PM Kisan | 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! e-KYC पूर्ण केल्याशिवाय येणार नाही 10वा हप्ता, जाणून घ्या प्रक्रिया

Whatsapp Cryptocurrency Payment | ‘व्हॉट्सअप’ने केली घोषणा, आता क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार करू शकतात यूजर्स

Pune Crime | अबब ! पुण्यात चक्क वार्षिक 240 % व्याजदर; व्याजाच्या नावाखाली 12 लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल